...म्हणून मला बिभिषणाप्रमाणे लंकेतून बाहेर काढलं गेलं’’, कीर्ती आझाद यांची भाजपावर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 20:12 IST2025-03-11T20:09:20+5:302025-03-11T20:12:10+5:30
Kirti Azad News: मी क्रिकेटमधील एक घोटाळा उघडकीस आणल्याने मला पक्षाने ज्या प्रमाणे बिभिषणाला लंकेतून बाहेर काढण्यात आलं होतं, त्याप्रमाणे पक्षातून बाहेर काढलं, असा आरोप कीर्ती आझाद यांनी केला आहे.

...म्हणून मला बिभिषणाप्रमाणे लंकेतून बाहेर काढलं गेलं’’, कीर्ती आझाद यांची भाजपावर बोचरी टीका
भाजपाचे माजी नेते आणि तृणमूल काँग्रेसचे विद्यमान खासदार कीर्ती आझाद यांनी आज संसदेत चर्चा सुरू असताना भाजपावर बोचरी टीका केली. मी क्रिकेटमधील एक घोटाळा उघडकीस आणल्याने मला पक्षाने ज्या प्रमाणे बिभिषणाला लंकेतून बाहेर काढण्यात आलं होतं, त्याप्रमाणे पक्षातून बाहेर काढलं, असा आरोप कीर्ती आझाद यांनी केला आहे.
संसदेमध्ये आज मणिपूरसी संबंधित अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होत होती. त्या चर्चेमध्ये कीर्ती आझाद हेही सहभागी झाले होते. त्यावेळी भाजपावर टीका करताना कीर्ती आझाद म्हणाले की, या लोकांना माझ्यापेक्षा जास्त कुणी ओळखत नाही. मी क्रिकेटमधील ४०० कोटी रुपयांचा घोटाळ्या प्रकरणी आवाज उठवला होता. तेव्हा मला बिभिषणाप्रमाणे लंकेतून हाकलण्यात आले.
कीर्ती आझाद हे भाजपाचे माजी खासदार असून, पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच ते आता तृणमूल काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार आहेत.