"इसलिए मैने बढाई है दाढी"; राज्यसभेत आठवलेंची कविता अन् अमित शहांना हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:59 PM2023-08-08T13:59:57+5:302023-08-08T14:01:35+5:30

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारणातील विवादाचं केंद्र बनलेलं दिल्ली सेवा बिल आज राज्यसभेत पारित झालं.

So maine badhai hai beard; Ramdas Athawale's poem in Rajya Sabha and smile to Amit Shah | "इसलिए मैने बढाई है दाढी"; राज्यसभेत आठवलेंची कविता अन् अमित शहांना हसू

"इसलिए मैने बढाई है दाढी"; राज्यसभेत आठवलेंची कविता अन् अमित शहांना हसू

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी संसेदत दिल्ली सेवा विधेयकाच्या चर्चेदरम्यान सहभाग घेत आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी, आठवलेंनी आपल्या स्टाईलमध्ये या विधेयकाचं समर्थन करताना विरोधकांवर टीका केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचं कौतुकही केलं. आठवलेंनी कविता म्हणत राज्यसभेत या विधेयकाला आपलं समर्थन दिलं.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारणातील विवादाचं केंद्र बनलेलं दिल्ली सेवा बिल आज राज्यसभेत पारित झालं. अनेक वादविवाद, चर्चा आणि गदारोळादरम्यान आज या विधेयकावर राज्यसभेमध्ये मतदान झालं. तेव्हा हे विधेयक पारित करण्याच्या बाजूने तब्बल १३१ सदस्यांनी मत दिलं. तर या विधेयकाविरोधात १०२ मते पडली. या विधेयकास रामदास आठवेलांनी कवितेच्या माध्यमातून समर्थन दिलं. त्यावेळी, भाषण करताना त्यांनी आम आदमी पक्षाला टोला लगावला.

अमित भाईंका इतना अच्छा आ गया है बिल
लेकीन सामने वालों को हो रहा है फील

नरेंद्र मोदीजीं के पास है, बहुत अच्छी वील
लेकीन दिल्ली मे हो रही है दारु के ठेके की डील

नरेद्र मोदी और अमित शहा की अच्छी जम गई जोडी
फिर काँग्रेस और आपवालों की कैसे आगे जाएगी गाडी

नरेंद्र मोदीजी जानते है जनता की नाडी
इसलिए बढाई है, मैने अपनी दाढी


नरेंद्र मोदी बाबासाहेबांचे संविधान बदलणारे नाहीत, ते संविधानाची रक्षा करत आहेत. दिल्ली सेवा विधेयक हे भारताच्या संविधानाची रक्षा करणारे बिल आहे. त्यामुळे, माझ्या रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने मी या विधेयकाचे समर्थन करतो आणि विरोधकांनीही या विधेयकाचे समर्थन केले पाहिजे, असे रामदास आठवलेंनी म्हटले. 

संजय राऊत यांचा विरोध, सरकारवर निशाणा

दिल्लीत विधानसभा आहे, दिल्लीतील लोकांनी निवडून दिलेलं सरकार दिल्लीत आहे. दिल्लीचे मुख्य सचिव किंवा एलजी मतं मागायला गेले नव्हते. लोकांनी त्यांना मत नाही दिले. मत मागायले गेले होते केजरीवाल किंवा मुख्यमंत्री किंवा एखादं सरकार, नेता. दिल्लीच्या विधानसभेत तुमचं ५ आमदार नाहीत, आजपर्यंत ६ वेळा तुम्ही दिल्लीची निवडणूक पराभूत झाला आहात. पण, दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल, प. बंगाल असेल किंवा तामिळनाडू असेल तुम्हा ताबा घेऊ इच्छिता, असे म्हणत राऊत यांनी दिल्ली सेवा विधेयकातील चर्चेदरम्यान मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. तसेच, मोदी सरकारला लोकशाही मान्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच, तुमच्याकडून सर्वकाही विकलं जात असल्याचं सांगताना त्यांनी काव्यपंक्तीही म्हटल्या.  

मत पुँछो के इस दौर मे क्या क्या नही बिका
आपके आँखो की शरम तक आपने बेच दी

कवि गोपालदास यांच्या या काव्यपंक्ती वाचून दाखवत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच, तुमच्या डोळ्यात लाजसुद्धा उरली नाही, असेही राऊत यांनी म्हटले. 
 

Web Title: So maine badhai hai beard; Ramdas Athawale's poem in Rajya Sabha and smile to Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.