काहींना 'खाती' बंद होत असल्याचं दु:ख; मोदींचा निशाणा, तर विरोधकांच्या 'मोदी-अदानी भाय-भाय'च्या घोषणा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 03:08 PM2023-02-09T15:08:40+5:302023-02-09T15:11:20+5:30

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेला संबोधित केलं.

So many people getting empowered while someones account getting closed says PM Modi about congress | काहींना 'खाती' बंद होत असल्याचं दु:ख; मोदींचा निशाणा, तर विरोधकांच्या 'मोदी-अदानी भाय-भाय'च्या घोषणा! 

काहींना 'खाती' बंद होत असल्याचं दु:ख; मोदींचा निशाणा, तर विरोधकांच्या 'मोदी-अदानी भाय-भाय'च्या घोषणा! 

googlenewsNext

नवी दिल्ली- 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. तसंच गेल्या ९ वर्षात झालेल्या कामांची माहिती सादर केली. यावेळी उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात 'मोदी अदानी भाय-भाय'च्या घोषणा दिल्या. देशात गेल्या ९ वर्षात ४८ कोटी जनधन खाती उघडली गेल्याची माहिती मोदींनी सभागृहाला दिली. यावेळी गरीबांची खाती उघडली जात आहेत, तर काहींना त्यांची खाती बंद होत असल्यानं दु:ख होत आहे. त्यांचं दु:खं मी समजू शकतो असा टोला पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेत्यांना लगावा. 

"मी कलबुर्गीला भेट देतो म्हणून खर्गेजी माझ्यावर टीका करतात. पण त्याठिकाणी आजवर काय कामं झाली आहेत हे त्यांनी पाहिलं पाहिजे. कर्नाटकात एकूण १.७० कोटी जनधन खाती उघडली गेली आहे. तर एकट्या कर्नाटाकत ८ लाख खाती उघडली गेली आहेत. बहुतांश लोक सक्षम होत आहेत. पण काहींची खाती बंद होत असल्यानं त्यांना दू:खंही होत आहे. त्यांना होत असलेलं दु:ख मी समजू शकतो", असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला.    

अनेक दशकं आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष झालं. त्यांच्या हिताला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले. देशातील जनता काँग्रेसला वारंवार नाकारत आहे. लोक त्यांना पाहत आहेत आणि त्यांना शिक्षा देत आहेत, असंही मोदी म्हणाले. 

सामान्य जनता हीच आमची प्राथमिकता
आमची प्राथमिकता सामान्य जनता हिच आहे आणि यामुळेच आम्ही देशातील २५ कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देऊ शकलो. आम्ही गेल्या ९ वर्षात ४८ कोटी जनधन खातील उघडली. तर गावागावात २२ तास वीज देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे लोक ‘गरीबी हटाओ’ म्हणायचे, पण ४ दशकांहून अधिक काळ काहीही केलं नाही. देशातील लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Title: So many people getting empowered while someones account getting closed says PM Modi about congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.