...म्हणून तिसऱ्या वर्षात शिक्षण सुरू! पुस्तकांऐवजी अनुभवातून शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:52 AM2020-07-31T04:52:45+5:302020-07-31T04:53:02+5:30

प्रा. राजेंद्र गुप्ता : प्राथमिक शिक्षणही उपयुक्त व्हावे; तिसरी ते पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासावर भर

... so start teaching in the third year! Learning from experience rather than books | ...म्हणून तिसऱ्या वर्षात शिक्षण सुरू! पुस्तकांऐवजी अनुभवातून शिक्षण

...म्हणून तिसऱ्या वर्षात शिक्षण सुरू! पुस्तकांऐवजी अनुभवातून शिक्षण

Next

प्रश्न : धोरणात पूर्व प्राथमिक व प्राथिमक शिक्षणावर जास्त भर..
होय. आपल्याकडे माध्यमिक शिक्षणात विद्यार्थी गळतीचे प्रमाण जास्त आहे. कारण प्राथमिक शिक्षण उपयुक्त नाहीच- असे अनेकांना वाटते. म्हणून आम्ही माध्यमिक सह प्राथमिक व पूर्व प्राथमिक वर जास्त भर दिला. प्राथमिक शिक्षण प्रासंगिक व्हावे. कारण त्याच वयात मुलांच्या मेंदूचा विकास झालेला असतो व अनुभवासह ज्ञानार्जन शक्य होते.


प्रश्न : वयाच्या तिसºया वषार्पांसून शिक्षणाचा आग्रह?
कारण मेंदू या वयापर्यंत माहिती-ज्ञान स्वीकारण्यासाठी तयार झालेला असतो-ही वैज्ञानिक सिद्धताही आहे. तिसºया वर्षापर्यंत मूल भाषा शिकते. आई-वडिलांना ओळखते. याचा अर्थच ते ज्ञानार्जन, माहिती संकलनासाठी तयार होते. पूर्वप्राथमिक मध्ये केवळ कुतुहलमिश्रित प्रात्यक्षिके असतील. आकृतीबंधात दुसरीपर्यंत फाउंडेशन स्टेज असेल. त्यात पुस्तकांऐवजी अनुभवातून शिक्षण होईल. तिसरी ते पाचवी प्रीपेरेटरी स्टेजमध्ये विद्यार्थ्यांच्या शारिरीक व बौद्धिक विकासावर भर असेल. हल्ली सहावीपासून पुढे शिकणाºया विद्याथ्यार्ची विज्ञान व संगीतात रुची असेल तर आपण त्याला म्हणतो- संगीत नको विज्ञान शिक. संगीतात रूची कायम ठेवल्यास विज्ञानातही गती मिळेलच. पुढचा टप्पा आठवीपासून व्होकेशनल शिक्षणाचा असेल.


प्रश्न : विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांनी कसे तयार व्हावे?
हे नव्या जगात टिकण्यासाठीचे धोरण आहे. विद्यार्थ्यांना अजून मुक्तपणे शिक्षण घेता येईल. पालकांवरील आर्थिक भार , मुलांच्या भविष्याची चिंता कमी होईल. शिक्षकांना एखादा विषय कसा शिकवावा याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. संलग्न विद्यालये ही संकल्पना बाद होईल. विद्यालयांना जास्त अधिकार असतील. त्या-त्या भागाची गरज ओळखून अभ्यासक्रम, कोर्स ठरवता येईल. यात सरकारी व खासगी संस्थाही आल्याच.


प्रश्न : कोरोनानंतरच्या जगात यामुळे कौशल्ये विकसित होतील?
: जग कोणतेही असू द्या- क्रिटीकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग व कल्पक शोध (इनोव्हेशन) ही कौशल्ये कधीच बदलत नाहीत . प्रश्न शोधा, सोडवण्यासाठी विचार करा व सोडवा - हेच तर हवे. उदाहरणार्थ : कोरोनानंतर पर्यटन क्षेत्राचे काय होईल- याचा दूरदर्शी विचार करून पथदर्शी उपाय हे शिक्षण देईल.


प्रश्न : विद्यार्थी, शिक्षण संस्था, शिक्षक, समाज...
एका सूत्रात येतील. गव्हर्नन्स, डिलिवरी, फायनान्स - याचे एक सूत्र तयार होईल. माजी विद्यार्थी शैक्षणिक संस्थांच्या गव्हर्निंग व्यवस्थापनाचे सदस्य असतील. छोटी गावे, खेडी उच्च शिक्षणाला जोडली जातील.
जिल्हास्थानी उच्च शिक्षण देणारी एक व्यवस्था उभी राहील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा खर्च वाचेल. शिक्षण लोककल्याणासाठी (पब्लिक गूड) आहे, नफेखोरीसाठी नाही. आम्ही ५४ वर्षांपासूनचा इंडियन एज्युकेशन सर्व्हिसचा आग्रह नाकारला.
कारण शिक्षक होण्यासाठी आता डेमोन्स्ट्रेशन महत्त्वाचे ठरेल. अर्ज केला, शिक्षण असले म्हणजे झालात शिक्षक असे होणार नाही. शिक्षकभरतीच्या मूल्यांकनासाठी फ्रेम वर्क तयार होईल.

Web Title: ... so start teaching in the third year! Learning from experience rather than books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा