... म्हणून भारतात येणारी प्रवासी वाहतूक ताबडतोब बंद करा, पृथ्वीराज चव्हाणांची सूचना

By महेश गलांडे | Published: December 21, 2020 10:45 AM2020-12-21T10:45:33+5:302020-12-21T10:52:41+5:30

देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे.

... So stop passenger traffic coming to India, suggests Prithviraj Chavan | ... म्हणून भारतात येणारी प्रवासी वाहतूक ताबडतोब बंद करा, पृथ्वीराज चव्हाणांची सूचना

... म्हणून भारतात येणारी प्रवासी वाहतूक ताबडतोब बंद करा, पृथ्वीराज चव्हाणांची सूचना

Next
ठळक मुद्देदेशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे. प्रसिद्ध विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितले की, देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात १६ पट अधिक आहेत

नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता नाही आणि समजा तशी लाट आलीच तर ती खूप गंभीर स्वरूपाची असणार नाही, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी काही वर्षांत कोरोना संसर्गाच्या छोट्या स्वरूपाच्या लाटा येत राहातील, असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र, युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्यामुळे, युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद ठेवली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन यासंदर्भात सूचवलं आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली असली तरी दररोज आढळणारे नवे रुग्ण व बळींची संख्या कमी होत आहे. प्रसिद्ध विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहिद जमील यांनी सांगितले की, देशात नोंदविल्या गेलेल्या रुग्णांपेक्षा प्रत्यक्षात १६ पट अधिक आहेत, असे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे देशात खरे तर १६ कोटी रुग्ण आहेत, असे म्हणता येऊ शकते. इतक्या रुग्ण असल्याने व त्यांची प्रतिकारक्षमताही वाढल्याने संसर्गाची साखळी अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे दुसरी लाट आलीच तरी फार गंभीर असणार नाही. मात्र, अद्यापही कोरोनाच धोका असल्याने लोकल, शाळा आणि काही आस्थापने बंदच आहेत. 

दरम्यान, कोरोना हा चीनमधून जगभर पसरला आहे, भारतातही विदेशातूनच कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे, अतिदक्षता घेण्यासाठी आता युके ते भारत हवाई प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याची सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे. ''विषाणूच्या नव्या प्रकारामुळे #UK मध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. सरकारने तेथून येणारी  संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक ताबडतोक स्थगित केली पाहीजे.'', असे ट्विट चव्हाण यांनी केलं आहे. विशेष म्हणजे लंडनमध्ये सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे,  भारत सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करायला हवा. 

अमेरिकेत एकाच दिवसात ४ लाख नवे रुग्ण
अमेरिकेमध्ये शुक्रवारी एकाच दिवसात ४ लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. त्या देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ८० लाख झाली असून १ कोटी ५ लाख जण बरे झाले. वाढच्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडल्याचे दिसून येत आहे. 

लंडनमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असून त्यामुळे नाताळच्या वेळेस बंधने शिथिल करण्याचा निर्णय पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रद्द केला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होते तसेच कडक स्वरूपाचे लॉकडाऊन आता लागू राहील.
 

Read in English

Web Title: ... So stop passenger traffic coming to India, suggests Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.