तेवढाच भयानक, अन् क्रूर! मणिपूरमधील आणखी एक व्हिडीओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 03:17 PM2023-07-21T15:17:43+5:302023-07-21T15:17:57+5:30

बुधवारी तीन महिलांना नग्न करून त्यांची हजारांच्या जमावाने परेड काढली होती. त्यांच्या भावाला आणि वडिलांची हत्या केली गेली होती.

So terrible, and cruel! Here is another video from Manipur violence after nude video | तेवढाच भयानक, अन् क्रूर! मणिपूरमधील आणखी एक व्हिडीओ समोर

तेवढाच भयानक, अन् क्रूर! मणिपूरमधील आणखी एक व्हिडीओ समोर

googlenewsNext

मणिपूरच्या हिंसाचाराने गेल्या दोन-अडीज महिन्यांपासून देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. तर दोन दिवसांपासून एका व्हिडीओने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ दोन महिन्यांपूर्वीचा असला तरी महिलांना नग्न करून जमावासमोर चालवत एका तरुणीवर बलात्कार केला आहे. यावरून गदारोळ उडालेला असताना आता आणखी एक व्हिडीओ समोर येत आहे.  

हा व्हिडीओ भयानक तर आहेच पण मणिपूर हिंसेच्या क्रूरतेचा चेहराही दाखवत आहे. या व्हिडिओमध्ये कुकी समाजातील एका व्यक्तीचे कापलेले डोके बांबूच्या कुंपणाला लटकलेले दिसत आहे. डेव्हिड थेक असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

हा व्हिडिओ बिष्णुपूर जिल्ह्यातील आहे. यामध्ये कुकी समाजातील डेव्हिड थेकचे छिन्नविछिन्न शीर एका निवासी भागात बांबूच्या कुंपणावर ठेवलेले दिसत आहे. 2 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारात डेविडची हत्या करण्यात आली होती. या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. 

बुधवारी तीन महिलांना नग्न करून त्यांची हजारांच्या जमावाने परेड काढली होती. त्यांच्या भावाला आणि वडिलांची हत्या केली गेली होती. यानंतर एका तरुणीवर सामुहिक बलात्कार केला गेला होता. सर्वात धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोरच हे सारे घडले होते. 

कुकी समाजाने काढलेल्या 'आदिवासी एकता मार्च' दरम्यान मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार झाला होता. यादरम्यान कुकी आणि मेईतेई समुदायामध्ये हिंसक हाणामारी झाली. तेव्हापासून तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 150 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Web Title: So terrible, and cruel! Here is another video from Manipur violence after nude video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.