...म्हणून त्या गावकऱ्यांनी स्वत:च नदीवर उभारला पूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 10:56 AM2018-07-17T10:56:57+5:302018-07-17T10:57:11+5:30
राज्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडणे आपल्याला नवीन नाही. नदीवर पूल बांधून देण्याच्या सरकारने वारंवार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी स्वत:च नदीवर पूल बांधला.
गुवाहाटी - राज्यकर्त्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडणे आपल्याला नवीन नाही. नदीवर पूल बांधून देण्याच्या सरकारने वारंवार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी स्वत:च नदीवर पूल बांधला. आसाम राज्यातील कामरूप आणि बारपेटा जिल्ह्यातील रहिवाशांनी कालाही नदीवर बांबूंच्या मदतीने हा पूल उभारला आहे.
Assam: Villagers of the Kamrup and Barpeta districts construct a bamboo bridge over Kalahi river. Villagers say, "Government had promised to construct a bridge but it never did. Many students use this bridge to get to their schools and colleges." pic.twitter.com/g1W8BFtydh
— ANI (@ANI) July 17, 2018
येथील रहिवाशांना नदीवर पूल बांधून देण्याचे आश्वासन सरकारकडून वारंवार देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती. अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेत बांबूंचा वापर करून नदीवर पूलाची बांधणी केली. "सरकारने आम्हाला नदीवर पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पूल बांधला गेला नाही. आता या पुलाचा वापत शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे, असे एका ग्रामस्थाने सांगितले.