साबणाने गोरेपणा तर नाही पण मिळाली ३० हजारांची नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2016 10:15 AM2016-01-19T10:15:52+5:302016-01-19T12:45:55+5:30

गोरेपणाची खात्री देणारा साबण वापरूनही रंग न उजळल्याने एका ग्राहकाने केरळमधील सर्वात लोकप्रिय 'इंदूलेखा' कंपनीवर दावा ठोकला आणि ३० हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळवली

Soap does not have amrogen but gets 30 thousand rupees compensation | साबणाने गोरेपणा तर नाही पण मिळाली ३० हजारांची नुकसानभरपाई

साबणाने गोरेपणा तर नाही पण मिळाली ३० हजारांची नुकसानभरपाई

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ - गो-या रंगाच्या आकर्षणापायी सौंदर्यप्रसाधनांवर शेकडो रुपये खर्च करणा-या आणि नागरिकांची हीच मानसिकता ओळखून अशा ' फेअरनेस' प्रॉडक्ट्सचा जाहिरातीतून भडिमार करणा-या कंपन्यांना चाप बसेल अशी घटना केरळमध्ये घडली आहे. गोरेपणाची खात्री देणारा साबण वापरूनही रंग न उजळल्याने एका ग्राहकाने केरळमधील सर्वात लोकप्रिय 
' इंदूलेखा' कंपनीवर दावा ठोकला आणि ३० हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळवली.
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते मामुटी यांनी केलेल्या 'इंदुलेखा' साबणाच्या जाहिरातीनंतर केरळमधील वायंडा जिल्ह्यात राहणारे ६७ वर्षीय  के. चथू यांनी हा साबण वापरण्यास सुरूवात केली. मात्र ब-याच काळानंरही त्यांचा रंग उजळलाच नाही, यामुळे चिडलेल्या के.चाथू यांनी कन्झ्युमर कोर्टात धाव घेऊन कंपनीने आपली दिशाभूल केल्याचा आरोप करत कंपनीकडून ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितली. 
' मामुटी हे अतिशय मोठे स्टार आहेत आणि आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. इंदुलेखा साबणामुळे काळ्या वर्णीयांचा रंग उजळून गोरा होत, असे त्यांनी म्हटल्याने अनेक नागरिकांनी तो साबण वापरला. मीही हा साबण ब-याच काळापासून वापरत आहे, पण काहीच झाले नाही, माझ्या रंगात फरक पडला नाही, मी अजूनही काळाच आहे. त्यामुळे या जाहिरातीतील त्यांचा (गोरेपणाचा) दावा अतिशय खोटा आहे', असे के. चाथू यांनी आपल्या दाव्यात म्हटले होते. मात्र कंपनीने कोर्टात ही केस न लढता 'आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट' करून के. चाथू यांना ३० हजार रुपये देऊन हे प्रकरण तिथेच संपवले.
मात्र या प्रकरणामुळे भारतीयांचा गोरेपणाचा अट्टाहास हेरून जाहिरीती करणा-या सौंदर्यप्रसाधन कंपन्या व त्यात काम करणारे स्टार्स यांच्याकडून ग्राहकांची होणारी दिशाभूल, हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

Web Title: Soap does not have amrogen but gets 30 thousand rupees compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.