Video : अपंगत्वालाही देतोय चॅलेंज, या तरुणाच्या जिद्दीला तुम्हीही कराल सॅल्यूट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 09:34 PM2018-09-14T21:34:13+5:302018-09-14T22:28:07+5:30
एकीकडे हलके काम करायला कुणालाही आवडत नाही. तर दुसरीकडे जेवढं सहज आणि आयतं मिळेल तेच काम करण्याचे प्रयत्न सर्वांकडून होतो.
मुंबई - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पायाने अपंग असलेला व्यक्ती चक्क कुबडीचा आधार हमालीचे काम करत आहेत. एका ट्रकमधून सिमेंटची गोणी उतरवण्याचे काम हा व्यक्ती करत आहे. नेटीझन्सच्या काळजाला हात घालणारा हा व्हिडीओ असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. तर व्हिडीओ पाहून तुम्हीही या युवकाच्या जिद्दीला सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाहीत.
एकीकडे हलके काम करायला कुणालाही आवडत नाही. तर दुसरीकडे जेवढं सहज आणि आयतं मिळेल तेच काम करण्याचे प्रयत्न सर्वांकडून होतो. तर अनेकजण आपल्या अपंगत्वाचा गैरफायदा घेत भीक मागताना किंवा इतरांची सहानुभूती मिळवताना आपण पाहतो. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीचा जेवढा काळजाला भिडतो, तेवढाच तो प्रेरणादायीही आहे. कारण, एक पाय नसताना, कुबड्याचा आधार घेऊन हा तरुण भीक मागत नाही. तर, चक्क सिमेंटचे पोते आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा कुबडीचा आधार घेत हमाली करत आहे. जोडीदाराच्या खांद्याला खांदा लावून हा तरुण प्रयत्न करत करत अपंगत्वालाही चॅलेंज देताना या व्हिडिोत दिसत आहे. एक पोते भरलेला सिमेंटच्या गोणीचा ट्रक गोदामात खाली करण्याचे काम हा तरुण जोडीदाराच्या सोबत करत आहे.
पाहा व्हिडीओ