ग्रामीण भागामध्ये साेशल मीडिया जाेरात; महिला वापरकर्त्यांमध्ये माेठी वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 08:45 AM2023-05-05T08:45:04+5:302023-05-05T08:45:28+5:30

नव्या युझर्समध्ये ५७% महिला हाेत्या. हा आकडा २०२५ पर्यंत ६५% एवढा असू शकताे

Social media in rural areas; Increase in female users | ग्रामीण भागामध्ये साेशल मीडिया जाेरात; महिला वापरकर्त्यांमध्ये माेठी वाढ 

ग्रामीण भागामध्ये साेशल मीडिया जाेरात; महिला वापरकर्त्यांमध्ये माेठी वाढ 

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात इंटरनेटचा वापर वाढला आहे. भारतात ७५.९ काेटी सक्रिय इंटरनेट वापरकर्ते असून महिन्यातून किमान एकदा तरी इंटरनेटचा वापर करतात. म्हणजेच निम्मयाहून अधिक लाेकांकडे इंटरनेट आहे. चालू वर्षाच्या अखेरीस हा आकडा ९० काेटी एवढा हाेण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, ग्रामीण भागात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

२०२२ मध्ये महिला वापरकर्त्यांमध्ये माेठी वाढ झाली. नव्या युझर्समध्ये ५७% महिला हाेत्या. हा आकडा २०२५ पर्यंत ६५% एवढा असू शकताे. एकूण युझर्समध्ये ५४% पुरुष आहेत. शहरांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची वाढ खुंटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शहरी भागात ७१ टक्क्यांपर्यंत इंटरनेटची पाेहाेच आहे. मात्र, या ठिकाणी केवळ ६ टक्के वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात १४ टक्के वाढ झाली आहे. 

कशाला पसंती?
इंटरनेटचा वापर मनाेरंजन, साेशल मीडिया, संवाद, ई-काॅमर्स इत्यादींसाठी माेठ्या प्रमाणावर हाेताे. ई-काॅमर्समध्ये दरवर्षी ५१% वाढ हाेत आहे.

Web Title: Social media in rural areas; Increase in female users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.