राम मंदिर मुद्यावर सोशल मीडिया

By admin | Published: February 10, 2016 01:18 AM2016-02-10T01:18:22+5:302016-02-10T01:18:22+5:30

रा.स्व. संघाने अयोध्या मुद्यावर सोशल मीडियातून संदेश देण्यासाठी २५० स्वयंसेवकांना खास प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. ‘राममंदिर एक वास्तव’ (राममंदिर ए रिअ‍ॅलिटी)

Social Media on the Ram Temple issue | राम मंदिर मुद्यावर सोशल मीडिया

राम मंदिर मुद्यावर सोशल मीडिया

Next

नवी दिल्ली : रा.स्व. संघाने अयोध्या मुद्यावर सोशल मीडियातून संदेश देण्यासाठी २५० स्वयंसेवकांना खास प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. ‘राममंदिर एक वास्तव’ (राममंदिर ए रिअ‍ॅलिटी) या शीषर्काखाली २० फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया सत्र आयोजित करण्यात येत आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदिर मुद्यावर संदेश देण्यासाठी केलेल्या आवाहनाची ही परिणती असल्याचे संघाच्या एका नेत्याने सांगितले. संघाने सोशल मीडियाचा वापर करणे ही नवी बाब राहिलेली नाही. यापूर्वीही असहिष्णुता आणि कलम ३७० सारख्या मुद्यांवर संघाने चर्चा घडवून आणलेली आहे. अलीकडेच संघाने नोंदणी अर्ज वितरित केले असून, त्यात वापर करीत असलेल्या फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉटस् अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचा उल्लेख अनिवार्य केला होता. टिष्ट्वटरवर फॉलोअर्स जास्त असलेल्यांसाठी खास सत्र आयोजित करण्यात येणार असून, त्यात न्यायालयाचा आदेश, पुरातत्व विभागाने (एएसआय) लावलेला शोध, अयोध्या हे प्रभूरामांचे जन्मस्थळ असल्याची मुस्लिमांनी दिलेली कबुली आणि अन्य तथ्यांची माहितीही देण्यात आली आहे. अशा प्रकाराची माहिती टिष्ट्वटरवर दिली गेल्यास लोकांना वास्तव कळून येईल, असे संघाला वाटते. संघाच्या मोहिमेत यापूर्वीच हजारावर स्वयंसेवकांनी नोंदणी केली असली तरी त्यापैकी केवळ २५० जणांची निवड केली जाणार आहे.

अपप्रचाराला प्रत्युत्तर
सोशल मीडियावर राममंदिराबाबत केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी ही मोहीम असल्याचे रा.स्व. संघाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Social Media on the Ram Temple issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.