सोशल मीडियावर 'न्यूड' फोटो टाकणा-या एक्स-गर्लफ्रेंडविरोधात महिलेची कोर्टात धाव
By admin | Published: February 28, 2017 09:53 AM2017-02-28T09:53:04+5:302017-02-28T09:56:50+5:30
सोशल मीडियावर आपला न्यूड फोटो पोस्ट केल्याबद्दल एका ४५ वर्षीय महिलेने तिच्या एक्स- गर्लफ्रेंडविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - सोशल मीडियावर आपला न्यूड फोटो पोस्ट केल्याबद्दल एका ४५ वर्षीय महिलेने तिच्या एक्स- गर्लफ्रेंडविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करत कोर्टात धाव घेतली. आरोपी महिलेने अंतरिम जामीनासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. संबंधित आरोपी महिलाही ४५ वर्षांची असून ती पीडितेसह गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील एका प्रसिद्ध रुग्णालयाच्या पॅथॉलॉजीमध्ये एकत्र काम करत होती. बराच काळ एकत्र काम केल्यानंतर त्या दोघी मुलुंड येथे एकत्र राहू लागल्या. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यात खटके उडायला लागले होते.
वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समलैगिंक पार्टनरविरोधात दाखल करण्यात आलेली अशा प्रकारची ही पहिलीच केस आहे. ४ फेब्रुवारी रोजी मुलुंडमधील नवघर येथे पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांच्या सांगण्यानुसार, त्या दोघीही एकमेकांना ब-याच काळापासून ओळखतात. त्या दोघींपैकी एकीचे या आधी लग्न झाले होते, मात्र काही कारणामुळे तिचे लग्न तुटले आणि त्यानंतर दोन्ही महिला मुलुंडमधील घरात एकत्र राहू लागल्या.
सहा महिन्यांपासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि खटके उडू लागले. त्याचवेळी आरोपी महिला गेल्या दोन वर्षांपासून पीडितेच्या फोटोंचा दुरूपयोग करून ते फेसबूक आणि सोशल मीडियावर पोस्ट करत होती. तसेच तिने पीडितेचा न्यूड फोटो आपला व्हॉट्सअॅप डीपी म्हणून ठेवल्याचे लक्षात पीडित महिलेने तिला जाब विचारला असता ती बाथरूममध्ये असताना तिचे फोटो काढल्याचे आरोपी महिलेने कबूल केले. त्यानंतर दोघींमध्ये मोठा वाद झाला आणि आरोपी महिलेने तिला तिचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर पीडित महिलेने ४ फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे दाव घेत त्या महिलेविरोधात तक्रार दाकल केली. मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा आरोपीने केला असून अंतरिम जामीनासाठी याचिकाही दाखल केली.
आरोपीकडून अदाप मोबाईल हस्तगत केला नसल्याचे सांगत तसेच त्या दोघीही एकत्रच काम करत असल्याने आरोपी इतर साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकते, असा युक्तिवाद करत पोलिसांनी तिच्या जामीनाला विरोध दर्शवला आहे. अकेर न्यायलयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला असून पोलिस लवकरच तिला ताब्यात घेणार आहेत.