सोशल मीडियावर 'आप रे आप' !
By admin | Published: February 10, 2015 03:58 PM2015-02-10T15:58:12+5:302015-02-10T19:19:26+5:30
दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळविणा-या 'आप'चे अनेकांनी 'बाप रे बाप' असे म्हणत अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणा-या आम आदमी पार्टीवर सोशल मीडियाकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. व्हॉट्सअप, फेसबूक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर सकाळपासूनच दणादण मेजेज आदळत आहेत. या मेसेजमध्ये निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागणा-या काँग्रेस, भाजपाची अनेकांकडून खिल्ली उडवण्यात येत आहे. दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळविणा-या 'आप'चे अनेकांनी 'बाप रे बाप' असे म्हणत अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. सकाळपासून व्हॉट्सअप, फेसबूक, ट्विटर यावर आलेले काही निवडक व मजेशीर मेसेज पुढीलप्रमाणे.
> 'श्रीमती बेदींचा चेहरा महागात पडला, झाडूमुळे दिल्लीत 'कमळ' आडला',
> ' ऐ दिल्ली तेरे आंगन में नया सूरज चढने वाला है, सुना है, मंहगे सूटों पर मफलर भारी पडने वाला है'
> 'बाप रे बाप' दिल्लीत आप, काँग्रेस, भाजपा झाली साफ'
> 'एका 'आम' तरुणाने भक्कम धूळ चारली, गाफिल 'शहानीती' वर विजयी बाजी मारली'
> 'नरेंद्र मोदींनी सगळ्यात जास्त झाडूचा प्रचार केला, पडले ना महागात 'स्वच्छ भारत अभियान'
> ' ओबामांची जादू ओसरली, तीन दिवस प्रचार करूनही भाजपचा दारूण पराभव.
> किरण बेदी गाणं म्हणत असतील, 'करवटें बदलते रहे सारी रात हम, 'आप' की कसम 'आप' की कसम'.
> शरद पवार मनोमनी म्हणत असतील, चार जागांचं दुःख काय असतं ते कळेल आता मोदी- शहांना'.
> दहा लाखाच्या 'कोटा'ला शंभर रुपयाचा 'मफलर' पडला भारी.
> दिल्लीतील जनतेनं योग्य क्रम लावला, ए फॉर आप, बी फॉर भाजप आणि सी फॉर काँग्रेस.
> दिल्लीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन बराक ओबामा राजीनामा देणार.
> कुणी एकटा दुकटा व्यक्ती जर मफलरने तोंड झाकून लपून-छपून दिल्लीतील रस्त्यावर फिरत असतील तर सावधान, ते अमित शहा असू शकतात'
> भाजपवाल्यांना 'आज' दिल्ली निकालाचे टेन्शन आणि 'उद्या' सामनाच्या अग्रलेखाचे.
> फटाके स्वस्त मिळण्याचं एकमेव ठिकाणी भाजपा दिल्ली कार्यालय.
> 'कमल'तोड परफॉरमन्स !