फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइट काही वेळासाठी झाल्या डाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 10:58 PM2017-08-26T22:58:58+5:302017-08-26T23:02:01+5:30
फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइट अचानक बंद पडल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई, दि. 26- फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइट अचानक बंद पडल्याचं पाहायला मिळालं. फेसबुक आणि इन्स्टाग्राम अचानक बंद झाल्याने युजर्सची मोठीच गैरसोय झाली. फक्त मुंबई आणि भारतातच नाही, तर जगभरात फेसबुक आणि इन्स्टाग्राम सुमारे आर्ध्यातासाठी बंद पडलं होतं. फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक बंद पडल्याने नेमके काय झालं याचा अंदाज युजर्सना आला नाही.
भारतासह जगभरातील अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद पडलं होते. दरम्यानच्या काळात कोणाचंही फेसबुक अकाऊंट लॉगइन किंना लॉगआउट होत नव्हतं. ही समस्या नेमकी का उद्भवली होती याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. फेसबुककडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. नेमकी कशामुळे ही समस्या उद्भवली हे जाणून घेण्यासाठी जगभरातील युजर्स रिपोर्ट करुन फेसबुककडे यासंदर्भातील माहिती विचारत आहेत.
When Facebook and Instagram are down, we be like....#facebookdownpic.twitter.com/yQ7jHfyW52
— Chicago Sport Social (@ChiSportSocial) August 26, 2017
शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून फेसबुक ही वेबसाईट अचानाक डाऊन झाली. यानंतर जगभरातील नेटिझन्सनी ट्विटरवरून त्याची खिल्ली उडवायला सुरूवात केली होती. अनेक प्रकारच्या विनोदी जिफ फाईल टाकून फेसबुक डाऊन झाल्याची खिल्ली उडवली जाते आहे. इतकंच नाही तर ‘फेसबुक डाऊन’ हा हॅशटॅग वापरून फेसबुक डाऊन असल्याचं सांगितलं गेलं.
Facebook and Instagram are down and people are on Twitter like: pic.twitter.com/bgNuhvARB7
— 👑 Lovatic (@King_Lovatic) August 26, 2017
फेसबुकवर कोणतीही पोस्ट पब्लिश करण्यात अडचणी येत आहेत, त्याचप्रमाणे कोणत्याही पोस्टला कमेंट किंवा लाईक करताना अनंत अडचणी येत आहेत अशी तक्रार जगभरातले लाखो नेटिझन्स करत आहेत. दुरूस्तीसाठी काही काळ फेसबुकची सुविधा उपलब्ध नाही तुम्ही थोड्या वेळाने प्रयत्न करा अशा कमेंट फेसबुकवर येत आहेत.