Social Viral: भारतही ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठी सज्ज

By admin | Published: August 10, 2016 01:59 PM2016-08-10T13:59:14+5:302016-08-10T14:05:00+5:30

देशभरात नवे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी संपुर्ण देशभरात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी साचलेलं पाणी, रस्त्यावरचे खड्डे तुम्हाला उत्तम खेळाडू बनवत असतात.

Social Viral: India is ready to organize the Olympics | Social Viral: भारतही ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठी सज्ज

Social Viral: भारतही ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठी सज्ज

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 10 - ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला जास्तीत जास्त पदकं मिळावी अशी सर्वांना अपेक्षा आहे. पण खेळाडूंना हव्या त्या सुविधा दिल्या जात नाहीत अशी तक्रार सर्वजण करत असताना दिसतात. मात्र हे खरं नाही, आपल्या प्रशासनाला, सरकारला आपली किती काळजी आहे याची लोकांना अजिबात जाणीव नाही. ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार व्हावेत यासाठी पुरेपूर काळजी ते घेत असतात. देशभरात नवे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी संपुर्ण देशभरात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत...रोज आपण अजाणपतेपणे खेळाडू म्हणून तयार होत असतो. पटत नसेल तर तुम्हीच स्वत:च पाहा
 
 
 
1)  आता ही ड्रेनेज लाईन नसती, आणि स्थानिक प्रशासनाने ही घाण साफ केली असती तर या महिलेने लांब उडीचा सराव कुठे केला असता
 
2) बॉक्सिंगचा सराव करायला रिंगची गरज आहे असं कुणी सांगितलं...रस्त्यावरही करु शकतो
 
3) दगडफेक करणा-या तरुणांपैकी एकाला जरी ऑलिम्पिकमध्ये पाठवलं तर सुवर्णपदक नक्की
 
4) आपल्याकडे टाईम फेन्सिंगमध्ये राजकीय पक्षही सहभागी होतात
 
5) रिले प्रकाराची सुरुवात 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटापासूनच झाली
 
6) पावसामुळे साचलेलं पाणी मुद्दामूनच ठेवलं जात...बघा या फोटोवरुन पटेल तुम्हाला
 
7) बास्केटबॉल कोणीही खेळतं, बास्केटचेअर खेळून दाखवा मग बघू
 
8) पुराच्या पाण्यामुळे आपल्यातही मायकल फेल्प्ससारखं पोहण्याचं कौशल्य आहे याची जाणीव होते
 
9) रस्त्यावरचे खड्डे उगाच नसतात
 

Web Title: Social Viral: India is ready to organize the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.