समाजसेवक अण्णा हजारे यांनी वाहिली डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 17:19 IST2024-12-27T17:15:42+5:302024-12-27T17:19:05+5:30
Manmohan Singh News: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशविदेशातील मान्यवरांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

समाजसेवक अण्णा हजारे यांनी वाहिली डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली, म्हणाले...
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशविदेशातील मान्यवरांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रामधील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनमोहन सिंग यांनी देश आणि समाजाच्या कल्याणाला नेहमी प्राधान्य दिलं, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहताना अण्णा हजारे म्हणाले की, ज्या व्यक्तीने जन्म घेतला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. मात्र काही व्यक्ती आपल्या मागे आठवणी आणि वारसा सोडून जातात. डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली होती.
दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणि लोकपालच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे यांनी व्यापक आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आणि अण्णा हजारे यांनी केलेल्या उपोषणामुळे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आले होते.