समाजवादी पक्षात फूट : शिवपाल यांचा नवा पक्ष, मुलायम असणार प्रमुख

By admin | Published: May 5, 2017 01:32 PM2017-05-05T13:32:16+5:302017-05-05T14:02:39+5:30

समाजवादी पक्षात आज फूट पडली असून समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते शिवपाल यादव यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे.

Socialist party split: Shivpal's new party, Mulayam will be chief | समाजवादी पक्षात फूट : शिवपाल यांचा नवा पक्ष, मुलायम असणार प्रमुख

समाजवादी पक्षात फूट : शिवपाल यांचा नवा पक्ष, मुलायम असणार प्रमुख

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 05 - उत्तर प्रदेशील विधानसभा निवडणूकीत समाजवादी पक्षाचा पराभव झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पक्षात अंतर्गत वाद उफाळून आल्याचे समोर आले. या वादानंतर अखेर आज  समाजवादी पक्षात फूट पडली असून समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते शिवपाल यादव यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. 
समाजवादी सेक्युलर मोर्चा, असे या पक्षाचे नाव असून या पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव असणार आहेत. यावेळी बोलताना शिवपाल यादव म्हणाले की, मुलायम सिंह यादव यांचा सन्मान परत आणण्यासाठी आणि समाजवादी लोकांना एकत्र आणण्यासाठी या नवीन पक्षाच्या माध्यमातून काम करण्यात येईल. 
मुलायम सिंह यादव यांनी 1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर गेल्या वर्षभरात पक्षात अंतर्गत वाद-विवाद होत असल्याचे दिसून येत होते. त्याचबरोबर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाच्या तिकीट वाटपावरुन समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा एका बाजूला गट आणि पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव आणि शिवपाल यादव यांच्यासह काही नेत्यांचा एक गट झाल्याचे पाहायला मिळाले होते. 
दरम्यान, जर अखिलेश यादव यांनी पक्षाची जबाबदारी मुलायम सिंह यादव यांच्याकडे दिली नाही, तर नवीन पक्ष काढला जाईल, असे गेल्या आठवड्यात शिवपाल यादव यांनी वर्तविले होते.   
 
 

Web Title: Socialist party split: Shivpal's new party, Mulayam will be chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.