मुलायम चितपट! अखिलेश यादव बनले सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष
By admin | Published: January 1, 2017 11:46 AM2017-01-01T11:46:28+5:302017-01-01T12:42:53+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 1 - गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंग यादव परिवार आणि समाजवादी पक्षात सुरू असलेल्या यादवीत अखेर अखिलेश यादव यांनी बाजी मारली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला आज सकाळी बोलावण्यात आलेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबरोबरच समाजवादी पक्षात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
लखनऊ, दि. 1 - गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंग यादव परिवार आणि समाजवादी पक्षात सुरू असलेल्या यादवीत अखेर अखिलेश यादव यांनी बाजी मारली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला आज सकाळी बोलावण्यात आलेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबरोबरच समाजवादी पक्षात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
अखिलेश आणि रामगोपाल यांचे निलंबन मागे घेण्यात आल्यावर सपामध्ये सारे काही आलबेल झाल्याचे चित्र रंगवण्यात येत होते. मात्र रविवारी नियोजित असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांनी शक्तिप्रदर्शन केले . लखनऊत झालेल्या सपाच्या या राष्ट्रीय अधिवेशनात प्रा. रामगोपाल यादव यांनी अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून या प्रस्तावास अनुमोदन दिले.
This National Executive unanimously elects Akhilesh Yadav ji as the national president of Samajwadi Party:Ramgopal Yadav pic.twitter.com/GEwsVGLjp5
— ANI UP (@ANINewsUP) 1 January 2017
ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांना पक्षाचे मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. यावेळी शिवपाल यादव यांना समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्याबरोबरच सपा आणि यादव परिवारातील वादात कळीच्या नारदाची भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या अमर सिंग यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज रामगोपाल यादव यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास उपस्थित राहू नये असे आवाहन मुलायम सिंग यादव यांनी कार्यकर्त्यांना केले होते. मात्र मुलायम यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत कार्यकर्ते आणि नेत्यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
This National Executive also wants Shivpal Yadav to be removed as state president and Amar Singh be sacked from the party: Ramgopal Yadav
— ANI UP (@ANINewsUP) 1 January 2017
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवार निवडीवरून समाजवादी पक्षातील वाद उफाळून आला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मुलायम सिंग यादव यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवले होते. मात्र एका दिवसातच हे निलंबन मागे घेण्यात आल्याने यादव परिवार आणि समाजवादी पक्षात सुरू असलेली यादवी संपल्याची चिन्हे दिसत होती. मात्र रविवारी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यावर ठाम असलेल्या अखिलेश गटाने आज अधिवेशन बोलावून शिवपाल यादव यांच्यासह मुलायम सिंग यादव यांना धोबीपछाड दिला.
Agar Netaji ke khilaaf saazish ho toh Netaji ka beta hote huye meri zimmedari banti hai ki main saazish ko saamne laaon:Akhilesh Yadav pic.twitter.com/vktjyWHfiy
— ANI UP (@ANINewsUP) 1 January 2017