भारताचं ऐतिहासिक पाऊल! 'चांद्रयान 2' मध्यरात्री चंद्रावर उतरणार; अनेक रहस्य उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 09:51 AM2019-09-06T09:51:52+5:302019-09-06T09:52:42+5:30

चांद्रयान 2 च्या माध्यमातून चंद्रावरील अनेक गुढ रहस्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न होणार आहे.

The soft landing of Chandrayaan 2 Vikram lander on lunar surface is midnight today | भारताचं ऐतिहासिक पाऊल! 'चांद्रयान 2' मध्यरात्री चंद्रावर उतरणार; अनेक रहस्य उलगडणार

भारताचं ऐतिहासिक पाऊल! 'चांद्रयान 2' मध्यरात्री चंद्रावर उतरणार; अनेक रहस्य उलगडणार

googlenewsNext

नवी दिल्ली - चंद्र कसा बनला आहे? चंद्रात बदल का होतो? चंद्रावरील अनेक रहस्यांचा उलगडा कधी होणार? चंद्रावर पाणी आहे, असलं तर किती आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काळात चांद्रयान 2 आपल्याला देणार आहे. चांद्रयान 2 हे भारताचं स्वप्न आज मध्यरात्री पूर्ण होणार आहे. मध्यरात्री 1.30 ते 2.30 च्या दरम्यान चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. चंद्राच्या साउथ पोलमध्ये ही लँडिंग होईल. आजतागायत याठिकाणी कोणताही देश पोहचला नाही. 

चांद्रयान 2 च्या माध्यमातून चंद्रावरील अनेक गुढ रहस्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न होणार आहे. यातून भविष्यात चंद्रावरील अभियानात नेमके कोणते बदल करणे गरजेचे आहे अथवा कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा याचंही निरीक्षण केलं जाणार आहे. पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा उपग्रह चंद्र आहे. जर या उपग्रहाची माहिती मिळाली तर अंतराळातील रहस्य शोधणं सोपं होईल. 

तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार 
इस्त्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल. 
प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल. 
दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल 

चंद्रावरील पाण्याबाबत मिळणार उपयुक्त माहिती
चंद्र कसा बनला आणि विकसित झाला याची काही माहिती उपलब्ध आहे. मात्र चंद्राची उत्पतीबाबत आणखी जास्त माहिती घेणे गरजेचे आहे. चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे चांद्रयान 1 ने मिळविले होते आता चांद्रयान 2 चा उद्देश चंद्रावरील एकूण भागात किती आणि कुठे कुठे पाणी आहे? या भागात खनिज आहे का? कोणते डोंगर आहेत का? तेथील मातीची विशेषता काय? चंद्रावर भूकंप होतो का? अशी माहिती शोधली जाणार आहे. 

चांद्रयान 2 चे वैशिष्ट काय?
पहिलं अंतरिक्ष मिशन आहे जे चंद्राच्या मागील बाजूस उतरणार आहे
पहिला भारतीय अभियान आहे. स्वत:च्या तंत्रज्ञानावर चंद्रावर उतरणार आहे
देशी तंत्रज्ञानाच्या आधारे चंद्रावरील माहिती शोधणार आहे. 
अमेरिका, रूस आणि चीननंतर भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश आहे. 
या योजनेसाठी 978 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

Image

दरम्यान चांद्रयान 2 चंद्राच्या मागील बाजूस उतरणार आहे ज्याठिकाणी अंधार असतो. चंद्राच्या दर्शनी भागात सर्वात जास्त पाणी असल्याचे संकेत आहेत. तसेच सौर मंडळाची सुरुवात या अंश क्षेत्रापासून होते. चांद्रयान 2 चे विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोवर हे चंद्रवरील दोन खड्ड्याच्या मध्ये उतरणार आहे.  
 

Web Title: The soft landing of Chandrayaan 2 Vikram lander on lunar surface is midnight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.