उद्योजकांना हॉटेलवर बोलवायची सॉफ्टवेअर इंजिनिअर, अखेर पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 03:22 PM2021-07-12T15:22:46+5:302021-07-12T15:23:55+5:30
अटक करण्यात आलेली महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर होती, तर तिचा एक मित्र एमबीए ग्रॅज्युएट आणि दुसरा इंजिनिअर असूनही स्पा सेंटरचा मालक होता. उद्योजकांना आपल्या निशाण्यावर ठेऊन या तिघांनी सेक्स रॅकेटचं जाळं टाकण्याचा धंदा सुरु केला होता
नवी दिल्ली - लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावल्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणीने गुन्हेगारीचा मार्ग स्विकारला. मात्र, अखेर तिला पोलिसांच्या बेड्या पडल्या. नोकरी गेल्यानंतर आपल्या मित्रांसमवेत लोकांना सेक्सच्या जाळ्यात अडकविण्याचा धंदा या तरुणाने सुरु केला होता. मात्र, एका घटनेनंतर हा उलगडा होताच, पोलिसांनी तिच्या दोन मित्रांसह तरुणीलाही अटक केली आहे.
अटक करण्यात आलेली महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर होती, तर तिचा एक मित्र एमबीए ग्रॅज्युएट आणि दुसरा इंजिनिअर असूनही स्पा सेंटरचा मालक होता. उद्योजकांना आपल्या निशाण्यावर ठेऊन या तिघांनी सेक्स रॅकेटचं जाळं टाकण्याचा धंदा सुरु केला होता. सेक्सच्या प्रलोभनाने आलेल्या उद्योजकांचे व्हिडिओ आणि नग्न फोटो पाठवून त्यांना ब्लॅकमेल रण्यात येत होते. मध्यमवयीन व्यावसायिकांना लक्ष्य करुन, जाळ्यात अडकवून हॉटेलपर्यंत आणण्याचं काम 29 वर्षीय तरुणीकडे होते. गेल्यावर्षी सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे शालिनीची नोकरी गेली. त्यामुळे तिने या धंद्यात स्वत:ला सहभागी करत पैसे कमवायला सुरुवात केली होती.
29 वर्षीय शालिनी टिंडर अॅपवर मध्यम वयाच्या उद्योजकांना फसवून त्यांना हॉटेलवर बोलवत होती. त्यानंतर, पर्समधील (हँडबॅग) फीट कॅमेऱ्यातून संबंधि ग्राहकाचे फोटो घेत. लॉकडाऊनमध्ये गेल्यावर्षी शालिनीची नोकरी गेल्यानंतर ती या गँगचा भाग बनली होती. शालिनीने नोकरी गेल्यानंतर मित्राकडे नोकरीची विचारणा केली होती, जो मित्र स्पा सेंटर चालवत होता. शालिनी गँगमध्ये सहभागी होताच तिने टिंडर अॅपवर प्राफाईल अकाऊंट बनवले होते. त्यातूनच तिने हा नवीन धंदा सुरु केला होता. शालिनी हॉटेलपर्यंत कस्टमर आणायची आणि त्यानंतर, तिचे दोन मित्र व्यावसायिकास धमकावून त्यांच्याकडून पैसे लाटत होते.
हॉटेलमधी आपत्ताजनक आणि नग्न व्हिडिओ संबंधित व्यावसायिका दाखवून पैशांची मागणी करण्यात येत होती. 10 लाख ते 1 कोटीपर्यंत पैशांची मागणी हे त्रिकुट करत होते. त्यावेळी, अनेकजण आपली इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून पैसे देत होते. मात्र, शेवटी ज्या व्यक्तीस लक्ष्य केले होते, त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या तपास कामासाठी एक पथक नेमले. त्या पथकाने सापळा रचून या त्रिकुटाला अटक केली.