सॉफ्टवेअर इंजिनिअर: पत्नी दिवसा, तर पती रात्री कामावर; घटस्फोट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:52 PM2023-04-23T22:52:17+5:302023-04-23T22:52:37+5:30
न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या पीठासमोर हे प्रकरण आले. त्यांनी या दोघांना तुमच्याकडे वैवाहिक नाते निभावण्यासाठी वेळ आहेच कुठे असा सवाल केला.
सर्वोच्च न्यायालयात एक विचित्र परिस्थितीतील घटस्फोटाचे प्रकरण आले होते. पती पत्नी दोघेही बंगळुरुमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. परंतू, एक दिवसा कामावर जायची, तर दुसरा रात्री कामावर जायचा. यामुळे दोघांमध्ये वैवाहिक जीवन, संबंध राहिले नव्हते. या दोघांना घटस्फोट हवा होता. सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना नात्याला एक संधी देण्याचा सल्ला दिला, परंतू तो देखील या दोघांना मान्य नव्हता.
न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या पीठासमोर हे प्रकरण आले. त्यांनी या दोघांना तुमच्याकडे वैवाहिक नाते निभावण्यासाठी वेळ आहेच कुठे असा सवाल केला. तुम्हाला घटस्फोट घेताय त्याचे काहीच वाटत नाहीय, परंतू लग्न केल्याचा पस्तावा आहे. तुम्ही एकमेकांना एक संधी का नाही देत आहात, असा सवाल नागरत्ना यांनी केला.
बंगळुरू काही असे शहर नाहीय की तिथे सारखे सारखे घटस्फोट होत असतात, असे नागरत्ना म्हणाल्या. यावर दोघांच्याही वकिलांनी ही याचिका प्रलंबित असताना दोन्ही पक्षांनी आपापसात समझोता केला. न्यायालयाच्या मध्यस्थता केंद्रात जाऊन आले, असल्याचे सांगितले.
पती आणि पत्नी दोघेही एकाच गोष्टीवर सहमत झाले आहेत. ती म्हणजे परस्पर सहमतीने लग्न संबंध संपविणे. यासाठी पती पत्नीला पोटगी आणि अन्य गोष्टींसाठी एकरकमी 12.51 लाख रुपये देण्यास तयार आहे, असे वकिलांनी सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर करून टाकला. राजस्थान आणि लखनौमध्ये हुंडा बंदी कायदा, घरगुती हिंसाचार कायदा आणि इतर संबंधित बाबींअंतर्गत पती-पत्नीने दाखल केलेले विविध खटलेही न्यायालयाने रद्द केले.