सौरऊर्जेतून यंदा १ लाख मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट....

By admin | Published: June 3, 2016 06:31 AM2016-06-03T06:31:10+5:302016-06-03T06:33:36+5:30

भारतात २0१४ साली सौरऊर्जा (सोलर एनर्जी)निर्मिती फक्त २ हजार मेगावॅट होती. त्यात २0१६ साली साडेतीनपट वाढ झाली असून, आता जवळपास ७ हजार मेगावॅट वीजनिर्मिती सौरऊर्जेतून होते आहे

Solar Energy aims to generate 1 lakh MW electricity this year | सौरऊर्जेतून यंदा १ लाख मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट....

सौरऊर्जेतून यंदा १ लाख मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट....

Next

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : भारतात २0१४ साली सौरऊर्जा (सोलर एनर्जी)निर्मिती फक्त २ हजार मेगावॅट होती. त्यात २0१६ साली साडेतीनपट वाढ झाली असून, आता जवळपास ७ हजार मेगावॅट वीजनिर्मिती सौरऊर्जेतून होते आहे. यंदा आणखी १५ हजार मेगावॅट सौरऊर्जेची भर पडणार आहे. केंद्र व राज्य सरकारांनी २१ हजार मेगावॅट सौरऊर्जानिर्मितीसाठी टेंडर्स काढली आहेत. भारतात ७.५0 लाख मेगावॅट वीजनिर्मिती केवळ सौरऊर्जेतून होऊ शकते ही बाब लक्षात आल्यावर नजीकच्या कालखंडात या क्षेत्रातून १ लाख मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट मंत्रालयाने ठेवले आहे.
भारतात सौरऊर्जेची वीजनिर्मिती तुलनेने स्वस्त असून, भविष्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतियुनिट ३ रुपयांपर्यंत त्याचा निर्मिती खर्च खाली यावा, यासाठी मंत्रालयाने रिव्हर्स बीडिंगचा प्रयोगही अंमलात आणला आहे. जमिनीवरील पॅनल्सद्वारे प्रत्येकी ५00 मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या २५ सोलर पार्क्सना सुरुवातीला केंद्राने मंजुरी दिली. आता त्यात आणखी ७ पार्क्सची भर पडली असून, सोलर पार्क्सची क्षमता १९४00 मेगावॅटची आहे.

Web Title: Solar Energy aims to generate 1 lakh MW electricity this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.