अतिरेक्यांचे कौतुक करणा-या सलाउद्दीनच्या मुलाला जवानांनी वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2016 10:41 AM2016-02-26T10:41:45+5:302016-02-26T10:46:59+5:30

अतिरेक्यांचे कैतुक करणा-या सलाहउद्दीनच्या मुलाला जम्मू-काश्मीर पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी वाचवले.

The soldiers saved salauddin's son, who appreciated the terrorists | अतिरेक्यांचे कौतुक करणा-या सलाउद्दीनच्या मुलाला जवानांनी वाचवले

अतिरेक्यांचे कौतुक करणा-या सलाउद्दीनच्या मुलाला जवानांनी वाचवले

Next

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. २६ - पाम्पोर चकमकीत भारतीय जवानांना जास्तवेळ झुंज दिल्याबद्दल हिजबुल मुजाहीद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन लष्कर ए तोएबाच्या अतिरेक्यांचे कैतुक करत आहे मात्र त्याच्या स्वत:च्या मुलाला जम्मू-काश्मीर पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी वाचवले. 
पाम्पोर चकमकीत तीन दहशतवादी ज्या सरकारी इमारतीत घुसले होते तिथे सलाउद्दीनचा मुलगा सय्यद मुईन संगणक विश्लेषक म्हणून नोकरी करतो. तीनही दहशतवादी इमारतीत घुसण्यापूर्वी सुरक्षापथकांनी सलाउद्दीनच्या मुलगा सय्यद मुईनला तिथून सुरक्षितपणे बाहेर काढले होते.  
माझी ओळख पटल्यानंतर सुरक्षापथकांनी माझी चौकशी केली नाही किंवा मला कुठलाही त्रास दिला नाही असे ३१ वर्षीय मुईनने सांगितले. आम्ही चकमकीमध्ये फसू नये यासाठी इमारतीत अन्य कर्मचा-यांप्रमाणेच त्यांनी माझीही सुटका केली असे मुईनने सांगितले. 
तीन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर लष्कराने सोमवारी ही चकमक संपल्याचे जाहीर करताच सल्लाउद्दीनने अतिरेक्यांचे फक्त कौतुकच केले नाही तर, त्यांना हिलाल ई शूजा हा शौर्य पुरस्कार जाहीर केला. सल्लाउद्दीनचे चार मुलगे आणि मुलगी जम्मू-काश्मीरमध्ये शासकीय सेवांमध्ये नोकरीला आहेत. 

Web Title: The soldiers saved salauddin's son, who appreciated the terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.