जवान आता सुट्टीमध्येही करणार देशसेवा, लष्कराचं महत्त्वाचं पाऊल, सर्वसामान्यांनाही होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 11:12 AM2023-09-02T11:12:37+5:302023-09-02T11:15:03+5:30
Indian Army : लष्कराचे जवान आता सुट्टीमध्येही देशसेवा करताना दिसणार आहेत. राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नांमध्ये हातभार लागावा यासाठी सुट्टीच्या दिवसांमध्ये जवानांनी सामाजिक सेवेमध्ये सहभागी व्हावे, असा लष्कराचा मनोदय आहे. ल
लष्कराचे जवान आता सुट्टीमध्येही देशसेवा करताना दिसणार आहेत. राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नांमध्ये हातभार लागावा यासाठी सुट्टीच्या दिवसांमध्ये जवानांनी सामाजिक सेवेमध्ये सहभागी व्हावे, असा लष्कराचा मनोदय आहे. लष्कराच्या देशभरातील सर्व विभागांना दर तिमाहीमध्ये याबाबतचा फिडबॅक देण्यास सांगण्यात आलं आहे. लष्कराच्या मुख्यालयाच्या एडजुटेंट जनरल शाखेचा समारंभ आणि कल्याण संचालनालयाद्वारे सर्व कमांडच्या मुख्यालयांना मे महिन्यामध्ये या संदर्भातील पत्र पाठवण्यात आलं होतं.
पत्रामध्ये लिहिण्यात आलं आहे की, सुट्टीवर जाणाऱ्या प्रत्येक सैनिकाने स्वेच्छेने त्यांची आवड योग्यता आणि आपल्या समाजाच्या व्यक्त केलेल्या आवश्यकता यानुसार कुठलाही विषय आणि क्षेत्रातील सामाजिक कार्याशी जोडून घेतले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्कराच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नांतर्गत त्यांनी या सामाजिक कार्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले पाहिजे.
पत्रामध्ये पुढे लिहिले आहे की, भारतीय लष्कराच्या प्रत्येक जवानाचा बायोडाटा एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिगत गुण, कौशल्य आणि सेवेमधून प्राप्त केलेलं चरित्र आणि मूल्यांनी भरलेला असतो. आमच्याकडील मनुष्यबळामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांचा समावेश आहे. त्यामध्ये विविध क्षेत्र आणि समुदायांचा समावेश आहे. बहुतांश सैनिकांची पार्श्वभूमी ही ग्रामीण भागातील आहे. आमचे सैनिक सुट्टीवर असताना नागरिक आणि स्थानिक समुदायांच्या जीवनाला प्रभावित करू शकतात. त्यामुळे आमच्या राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नांना बळ मिळेल.
आर्मी युनिटला सांगण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या जवानांना यासंदर्भातील आवश्यक साहित्य पुरवावं. त्यामुळे ते राजदूत म्हणून ते समाजाशी संवाद साधू शकतील आणि त्यांच्यासोबत जवळीक वाढवून एक सार्थक सैनिक बनतील. ही योजना तत्काळ प्रभावाने लागू केली जाईल. तसेच सप्टेंबर २०२३ पासून प्रत्येक तिमाहीमध्ये सर्व कमांडोंकडून फिडबॅक घेतला जाईल.