तबलिगींना मदत करणाऱ्या कंपन्यांची माहिती मागविली; पोलीस यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 02:04 AM2020-04-04T02:04:44+5:302020-04-04T06:30:53+5:30
सूद यांचा अद्याप ठावठिकाणा नाही
नवी दिल्ली : निझामुद्दीन तबलिगी मरकज कोरोना प्रसाराचे केंद्र बनल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. जमातीच्या मौलवींकडून कोणत्या देशातून किती जण आलेत, कोणत्या मार्गाने आलेत, विमान कंपन्यांची नावे, त्यांना व्हिसासाठी मदत करणाºया भारतीय कंपन्यांचीदेखील माहिती गृह मंत्रालय जमा करीत आहेत. त्यामुळे जमातीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती जमवून त्यांनाही तात्काळ क्वारंटाईन केले जाईल.
मौलाना साद यांनी सेल्फ क्वारंटाईन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी त्यांनी पोलिसांशी किंवा आरोग्य यंत्रणांशी संपर्क केला नसल्याने यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. मौलाना सूद यांच्या निझामुद्दीन, कैराना, जाकीरनगरमधील निवासस्थानी पोलिसांनी चौकशी केली. साद यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्यांकडेही पोलिसांनी विचारणा केली.
विशेष म्हणजे जमातीचे काम अद्यापही कागदावरच चालते. संगणकाचा वापर फारसा केला जात नाही. सहभागी सर्वांची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. निझामुद्दीन मरकज मधून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका रजिस्टरमध्ये १२२८ जणांची नोंद होती. प्रत्यक्षात २३६१ जण १ एप्रिलपर्यंत तेथे होते. त्यामुळे उरलेल्या १२२८ जणांची नोंद का करण्यात आली आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत
आहेत.
मौलाना सूद यांची उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीत निवासस्थान आहे. सर्व ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलीस पोहोचले. मात्र अद्याप त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
...तर मौलाना सूद यांच्यावर कारवाई
मुस्लीब पर्सनल लॉ बोडार्चे सदस्य कमाल फारुखी यांनी मौलाना साद यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. साद यांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. तबलिगी जमातीचे काम स्वातंत्र्याआधी सुरू झाले. ते फक्त धर्मप्रसाराचेच काम करतात.
च्अर्थात शिक्षणाचे प्रमाण त्यांच्यात कमी असते. अशावेळी मौलाना साद यांची जबाबदारी वाढते. मात्र त्यांनी बेकायदेशीर कृत्य केले असल्यास त्यांच्यावर नक्कीच कारवाई व्हावी, असेही कमाल फारूखी म्हणाले.