एकता, समेटासाठी संयमाची आवश्यकता : श्रीलंका

By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:31+5:302015-02-14T23:51:31+5:30

कोलंबो : लोकांत सलोखा व एकतेची भावना निर्माण करण्यासाठी तमिळ समुदायाने आपणास पुरेसा वेळ द्यावा, असे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे.

Solidarity requirement for peace, solidarity: Sri Lanka | एकता, समेटासाठी संयमाची आवश्यकता : श्रीलंका

एकता, समेटासाठी संयमाची आवश्यकता : श्रीलंका

googlenewsNext
लंबो : लोकांत सलोखा व एकतेची भावना निर्माण करण्यासाठी तमिळ समुदायाने आपणास पुरेसा वेळ द्यावा, असे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे.
लोकांत एकता, सलोख्याची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे आम्ही जाणतो; मात्र नवे सरकार नुकतेच सत्तेवर आले असल्याने सलोख्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरेसा वेळ गरजेचा आहे, असे सिरीसेना म्हणाले. कोलंबो येथील विदेशी गुंतवणूकदारांशी संवाद साधताना ते येथे शुक्रवारी बोलत होते. सर्व समुदायांना बंधुभावाने राहता यावे यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे, असे सिरीसेना म्हणाले. सिरीसेना यांना त्यांचे पूर्वपदस्थ महिंदा राजपाक्षेंविरुद्धच्या निवडणुकीत मुस्लिम व तमिळ नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे आठ जानेवारीच्या निवडणुकीत ते विजयी झाले. निवडून आल्यानंतर तमिळ समुदायासोबतचा तणाव कमी करण्यासाठी उचललेल्या पावलांची गणतीही त्यांनी केली. लष्कराने अधिगृहित केलेली जमीन मुक्त केली. यासारखी अनेक पावले उचलल्याचे ते म्हणाले. समेट, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठीच्या प्रक्रियेची गती संथ असल्याबद्दल तमिळ समुदायाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सिरीसेना यांनीही ही प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रांत परिषद ताब्यात असलेल्या टीएनएने यादवीदरम्यानच्या कथित हिंसाचाराबद्दल आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव अलीकडेच मंजूर केला होता. टीएनए हा तमिळींचा मुख्य पक्ष आहे. दुसरीकडे सिरीसेना यांनी देशांतर्गत चौकशीला भर दिल्याने राष्ट्रवादी तमिळ गटही नाराज आहेत.

Web Title: Solidarity requirement for peace, solidarity: Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.