भल्या भल्यांना अडलेलं २५०० वर्षापूर्वीचं पाणिनींचं कोडं सोडवलं, भारतीय विद्यार्थ्याची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:41 PM2022-12-16T13:41:04+5:302022-12-16T13:41:37+5:30
Indian Sanskrit Scholar Rishi Rajpopat: संस्कृतच्या विद्वानांना अनेक वर्षांपासून अडलेलं अडीच हजार वर्षांपूर्वीचं आचार्य पाणिनींचं व्याकरणासंबंधिचं कोडं अखेर एका भारतीय विद्यार्थ्यानं सोडवलं आहे.
संस्कृतच्या विद्वानांना अनेक वर्षांपासून अडलेलं अडीच हजार वर्षांपूर्वीचं आचार्य पाणिनींचं व्याकरणासंबंधिचं कोडं अखेर एका भारतीय विद्यार्थ्यानं सोडवलं आहे. केंब्रिज विद्यापीठात शिकत असलेला २७ वर्षीय भारतीयविद्यार्थी ऋषी राजपोपट याने ही कमाल करून दाखवली आहे. गुरुवारी सबमिट केलेल्या पीएचडीच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
ऋषी राजपोपट याने आचार्य पाणिनी यांनी इसवीसनपूर्व पाचव्या शतकात सांगितलेल्या एका नियमाचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. आचार्य पाणिनी यांना संस्कृत व्याकरणाचे जनक मानले जाते. ऋषी राजपोपट याच्या थीसिस इन पाणिनी वी ट्रस्टः डिस्कवरिंग द एल्गोरिदम फॉर रूल कंफ्लिट रेझोल्युशन इन द अष्टाध्यायी मध्ये पाणिनीच्या त्या व्याकरणासंबंधीच्या कोड्याचा उलगडा समाविष्ट आहे.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीमध्ये मुख्य संस्कृत अभ्यासकांनी राजपोपट याने लावलेला शोध हा क्रांतिकारी असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ आता पाणिनींचं व्याकरण संगणकाद्वारे शिकवणं शक्य होऊ शकतं. राजपोपट याने लावलेला शोध पाणिनीच्या व्याकरणाच्या अनुरूप योग्य शब्दांची निर्मिती करण्यासाठी कुठल्याही संस्कृत शब्दाच मूळ शोधणे शक्य बनवते. पाणिनींच्या या व्याकरणाला व्यापकपणे इतिहासातील सर्वात मोठा बौद्धिक ठेवा मानला जातो. आता राजपोपट याने लावलेल्या शोधानंतर हा ठेवा सोपा होईल.