कछमध्ये पाकिस्तानी बोट बीएसएफने घेतली ताब्यात
By admin | Published: March 5, 2016 07:38 PM2016-03-05T19:38:59+5:302016-03-05T20:17:56+5:30
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कछ कोटेश्वरमधील खाडी परिसरातून पाकिस्तानी बोट जप्त केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
भुज (गुजरात), दि. ५ - सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कछ कोटेश्वरमधील खाडी परिसरातून पाकिस्तानी बोट जप्त केली आहे. कछ समुद्रकिना-याजवळ असलेल्या भारत - पाकिस्तान सीमारेषेवर सीमा सुरक्षा दलाला पाहताच बोटीमधील लोकांनी पलायन केले. तर दुसरीकडे कछमध्ये लष्करी छावणीचे फोटो काढणा-या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याप्रकरणी अलर्ट जारी केला आहे.
काल कोटेश्वरमधील खाडी परिसरातून पाकिस्तानी मच्छिमारी बोट जप्त करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) गस्त पथकाला पाहताच बोटीतील लोकांनी पाकिस्तानच्या दिशेने पलायन केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दिली आहे. बोटीमध्ये काहीच संशयित आढळलं नाही आहे. गेल्या 5 महिन्यात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केलेली ही पाचवी कारवाई आहे. गेल्यावेळीदेखील कोटेश्वरमधील खाडी परिसरातून बोट जप्त करण्यात आली होती.
तर दुसरीकडे कछ जिल्ह्यात लष्कराच्या छावणी परिसरात संवेदनशील भागांचे फोटो काढणा-या व्यक्तीला लष्कराच्या जवानांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्याचं नाव आयुब खान असून भुजमधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. आयुब खान व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर आहे. आयुब खानचा मोबाईल फोनदेखील जप्त करण्यात आला आहे.