काही हिंदू समूहांकडून मुस्लिम कट्टरवाद्यांसारखे वर्तन - जावेद अख्तर
By admin | Published: January 27, 2016 09:03 PM2016-01-27T21:03:47+5:302016-01-27T21:03:47+5:30
काही हिंदू समूह आता मुस्लिम कट्टरवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. ही काही तत्त्वे वगळली तर भारतीय समाज कायम सहिष्णु राहिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.२७ - काही हिंदू समूह आता मुस्लिम कट्टरवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. ही काही तत्त्वे वगळली तर भारतीय समाज कायम सहिष्णु राहिला आहे असे मत सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात काही साहित्यिक व कलावंतांनी विरोधाचे हत्यार उपसले असताना अख्तर यांनी मुद्यावर थेट बोलणे टाळले. ते कोलकाता येथे एका साहित्य सोहळ्यात बोलत होते.
१९७५ मध्ये मी माझ्या एका चित्रपटात मंदिरातील विनोद दृश्य दाखवले होते. त्या काळात मशिदीत मी असे दृश्य दाखवू शकलो नसतो. कारण तिथे असहिष्णुता होती. आत्ताचे विचाराल तर आता मी मंदिरातही विनोदी दृश्य दाखवणार नाही. याचे कारण म्हणजे आता पहिला पक्ष दुसऱ्या पक्षासारखा वागू लागला आहे. हिंदू नाही तर काही हिंदू समूह आज घडीला मुस्लिम कट्टरवाद्यांसारखे वर्तन करीत आहे. हे क्लेषकारक आहे.
समाजातील असहिष्णुता धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याचे काही लोक मानत आहेत. मला यावर विश्वास नाही. देशात कुठलीही असहिष्णुता नाही, असेही काही जणांचे मत आहे. मला यावरही विश्वास नाही. खरे सांगायचे तर सध्या देशात या दोघांमधली स्थिती आहे. असेही ते म्हणाले.