सैन्यात भरती होण्यासाठी काही पण !

By admin | Published: May 26, 2017 01:12 PM2017-05-26T13:12:03+5:302017-05-26T14:10:53+5:30

सैन्यामध्ये भर्ती होण्यासाठी अनोखी शक्कल हरियाणाच्या कॅथलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने लढवली आहे.

Some to join the army! | सैन्यात भरती होण्यासाठी काही पण !

सैन्यात भरती होण्यासाठी काही पण !

Next
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 26- सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी खरंतर तरूणांकडून विशेष मेहनत घेतली जाते. कधीतरी या मेहनतीचं फळ त्या व्यक्तीला मिळतं तर कधी निराशासुद्धा स्विकारावी लागते. सैन्यामध्ये भरती होण्यासाठी अनोखी शक्कल हरियाणाच्या कॅथलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने लढवली आहे. हरियाणाच्या कॅथलमध्ये राहणारे शिव (बदललेलं नाव) यांनी मागील वर्षी शीख रेजिमेंटमध्ये रूजू होण्यासाठी सगळ्या परिक्षा पास केल्या होत्या. पण त्यानंतर शिव यांच्याबद्दलच्या काही गोष्टी तेथे असलेल्या प्रशिक्षणार्थीच्या लक्षात आल्या. शिव यांनी आपण शीख असल्याचं सांगितलं होतं पण त्यांना पंजाबी भाषा बोलता येत नव्हती तसंच त्यांचं नाव हिंदू होतं. म्हणून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली.  चौकशीदरम्यान सैन्यात भरती होण्यासाठी आणि स्वतःला शिख दाखवण्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्र तयार करून घेतल्याची कबूली दिली आहे.   
मागील दोन वर्षामुळे हरियाणी तरूणांच्या विरोधात 51 एफआयआर दाखल झाले आहेत. शिव हे यापैकीच एक उदाहरण आहे ज्याने सैन्याच्या शीख रेजिमेंटमध्ये भर्ती होण्यासाठी खोटी कागदपत्र तयार करून घेतली आहेत. या घटनेमुळे हरियाणात असलेल्या बेरोजगारीचं वास्तव समजतं आहे. चांगली जीवनशैली जगता यावी यासाठी सैन्यदल हा एकमेव पर्याय असल्याचं हरियाणाच्या तरूणांचं मत आहे. 
सैन्यामध्ये भरती होण्यासाठी आलेले हे तरूण भरतीसाठीच्या परीक्षा पास होतात पण प्रशिक्षणा दरम्यान त्यांचा खोटेपणा उघड होतो. काही एफआयआरच्या अभ्यासानुसार, काही तरूण कागदपत्रांमध्ये जातीच्या प्रमाणपत्रात स्वतःच्या नावापुढे शीख लावतात. तर काही जण गुरूद्वारामध्ये जाऊन अमृत प्राशन करतात आणि शिख धर्माचा स्विकार करतात. सैन्यदलाच्या भरती प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर हरियाणाच्या तरूणांकडून या गोष्टी केल्या जातात. 
भारतीय सैन्यात सांस्कृतिक समानता जपण्यासाठी विविध दलांची स्थापना करण्याल आली आहे. ब्रिटीशांपासून ही पद्धत आत्मसात केली जाते आहे. 
सिमरजीत (बदललेलं नाव) यांनीसुद्धा शीख रेजिमेंटमध्ये भर्ती होण्यासाठी शीख धर्माचा स्विकार केला आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीनंतर ही बाब समोर आली आहे. रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी सिमरजीत यांना शीख धर्माचे काही नियम आणि सिद्धांत विचारले होते. पण त्याची उत्तर सिमरजीत यांना देता आली नाही. त्यानंतर शीख रेजिमेंटमध्ये भर्ती होण्यासाठी गुरूद्वारामध्ये जाऊन अमृत प्यायल्याची कबूली सिमरजीत यांनी दिली आहे. शिव आणि सिमरजीत या दोघांना सैन्यातून काढून टाकण्यात आलं आहे तसंच त्यांच्यावर फौजदारी खटला चालवला जातो आहे. 
कर्नल विक्रम सिंह यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार,"शीख रेजिमेंटमध्ये येण्यासाठी अनेक तरूण खोटी कागद पत्र तयार करत आहेत. भर्ती प्रक्रियेमध्ये अशा तरूणांना ओळखणं कठीण असतं.  कागदपत्रांमध्ये गडबड आढळून आली की असे तरूण पकडले जातात."
 

 

Web Title: Some to join the army!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.