२०१६ विधानसभा निवडणूकतील काही लक्षवेधी घटना

By admin | Published: May 19, 2016 04:09 PM2016-05-19T16:09:16+5:302016-05-19T16:24:38+5:30

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील लक्षवेधी घटना...

Some notable events in the 2016 assembly elections | २०१६ विधानसभा निवडणूकतील काही लक्षवेधी घटना

२०१६ विधानसभा निवडणूकतील काही लक्षवेधी घटना

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ -  पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये मुसंडी मारली असून तेथील काँग्रेसचे राज्य खालसा झाले आहे. तर पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये अपेक्षेप्रमाणेच ममता बॅनर्जी व जयललिता यांची सत्ता कायम राहिली आहे. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातील काही लक्षवेधी घटना : 
१) पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाचही राज्यांत काँग्रेसची कामगिरी खालावली आहे. लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर काँग्रेसला पराभवाचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. देशातील २९ पैकी फक्त सहा राज्यात सध्या काँग्रेस सत्तेत असून केरळ, आसाममधील सत्ताही काँग्रेसने गमावली आहे. 
 
२) केरळमध्ये राष्ट्रवादीचा दे धक्का : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केरळच्या राजकारणात चंचू प्रवेश केला आहे, कुट्टनाड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थॉमस चांडी विजयी झाले, तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार ए के ससींद्रन यांनी जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) किशन चंद यांचा  मतांनी पराभव केला.
 
३) देशभरात हळूहळू पण ठामपणे भारतीय जनता पक्षाचा विस्तार होत आहे. सध्या देशात भाजपा ९ राज्यांमध्ये सत्तेवर असून ४ राज्यांमध्ये भाजपा भागीदारीमध्ये सत्तेत आहे. 
 
४) स्थानिक नेतृत्व ठरले महत्वाचे : दिल्ली व बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून भाजपाने धडा शिकला असून निवडणूक जिंकण्यासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पुरेसा नाही हे त्यांना उमजले आहे. स्थानिक निवडणूका याही अतिशय महत्वाच्या असून त्यासाठी खंबीर स्थानिक नेतृत्व व मुख्यमंत्रीपदाचा प्रबळ दावेदार असणंही तितकंच महत्वाचे असल्याचे भाजपाने हेरले आहे. आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून, हे त्यातूनच आलेलं शहाणपण होतं आणि त्याचा निकाल सर्वांसमोर आहे. तब्बल १५ वर्षांनंतर काँग्रेसने आसाममधील सत्ता गमावली आहे. 
 
५) राजकारणाला वयाची मर्यादा नाही : भारतीय परंपरेनुसार ६० व्या वर्षानंतर लोकांनी सर्व मोहमायांचा त्याग करून वानप्रस्थाश्रमाचे आचरण केले पाहिजे, भारतीय राजकारणात मात्र हा नियम बिलकूल लागू होत नाही. सव्वाशे कोटी भारतीयांमधील निम्मी लोकसंख्या ही तरूणांची असतानाही भारतीय राजकारण अद्यापही वयोवृद्धांचीच चलती असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळात पुन्हा सत्तेवर आलेला डाव्यांचा एलडीएफ आणि त्यांचे नेतृत्व करणारे व्ही. एस. अच्युतानंदन. ९३ वर्षी अच्युतानंदन यांनी आपल्या करिष्म्याचा जोरावर केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवली असून १४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत डाव्यांना ८५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. 
 
७) श्रीसंतचा राजकारणातही नो-बॉल: क्रिकेटच्या मैदानात फिक्सिंगच्या आरोपामुळे दरवाजे बंद झाल्यानंतर राजकारणाच्या पीचवर भाजपकडून खेळायला उतरलेल्या श्रीशांत पहिल्याच निवडणुकीत बाद झाला. भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या श्रीशांतचा काँग्रेस नेते व्ही.एस.शिवकुमार यांनी पराभव केला. 
 
८) गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणा-या भाजपला ओ राजागोपाल यांच्या रुपाने पहिले यश मिळाले आहे. ओ राजागोपाल केरळच्या नेमॉम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.  
 
९) महाभारतातील द्रौपदीचा राजकारणात पराभव - पश्चिम बंगालमध्ये उत्तर हावडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या रुपा गांगुली यांचा पराभव झाला. क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्लाने त्यांचा पराभव केला. द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. 

Web Title: Some notable events in the 2016 assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.