काश्मीरच्या काही भागांत दुसऱ्या दिवशीही संचारबंदी, मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:51 AM2019-05-26T04:51:15+5:302019-05-26T04:51:34+5:30
‘अल-कायदा’ शी संबंधित एका गटाचा स्वयंघोषित प्रमुख जाकिर मुसा सुरक्षादलांसोबतच्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरच्या काही भागांत लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी दुस-या दिवशीही कायम आहे.
श्रीनगर : ‘अल-कायदा’ शी संबंधित एका गटाचा स्वयंघोषित प्रमुख जाकिर मुसा सुरक्षादलांसोबतच्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरच्या काही भागांत लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी दुस-या दिवशीही कायम आहे. मुसा शुक्रवारी पुलवामात सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. श्रीनगर, कुलगाम आणि पुलवामाच्या काही भागांत संचारबंदी अजूनही लागू आहे, असे पोलिसांनी सांगितले. शाळा आणि महाविद्यालये आणि काश्मीर खोºयात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद आहे. बारामुल्ला-बनिहाल मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीर खोºयाच्या काही भागांत शनिवारी संचारबंदी लागू असेल. नौहाटा, रैनावाडी, खान्यार, सफाकदल आणि एमआर गुंग ठाण्याच्या क्षेत्रात कठोर प्रतिबंधक उपाय केले जात आहेत. दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात एका गावात सुरक्षादलांसोबत चकमकीत ‘अंसार गजावत-उल-ंिहंद’ चा जाकीर राशिद भट उर्फ जाकीर मुसा शुक्रवारी ठार झाला. मुसा पाकिस्तानच्या ंिनदानंतर कश्मीर खोºयात चर्चेत आला होता. त्याने बंदी असलेली अतिरेकी संघटना हिजबुल मुजाहिदीनशी असलेले संबंध तोडून अल-कायदाशी आपली निष्ठा व्यक्त केली होती. कॅरम खेळाडू मुसाने किशोरावस्थेत जम्मू आणि कश्मीरमधून वेगवेगळ््या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले होते.
मुसा एप्रिल २०१३ पासून अतिरेकी कारवायांत सक्रिय होता. त्याने जेव्हा बुरहान वाणीशी हात मिळवून शस्त्र हाती घेतले तेव्हा तो अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. वाणी याला सुरक्षादलांनी २०१६ मध्ये चकमकीत ठार मारले होते. दक्षिण कश्मीरमधील स्थानिक लोकांत मुसा याची लोकप्रियता गेल्या तीन वर्षांत वाढली होती आणि वाणी मारला गेल्यानंतर मुसाला त्याचा उत्तराधिकारी मानले जात होते.
मुसाने २०१६ मध्यें हुरियत नेत्यांना एका व्हिडिओतं धमकी देऊन अतिरेकी गट आणि फुटीरवाद्यांना धक्का दिला होता. त्याने म्हटले होते की, फुटीरवादी नेत्यांनी कश्मीर पाकिस्तानात विलीन करण्याच्या मागणीला पाठिंबा देणे बंद करावे.