काही लोकांमुळे चित्रपटसृष्टी दोषी ठरत नाही - जया बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 05:28 AM2020-09-16T05:28:35+5:302020-09-16T05:28:57+5:30
चित्रपटसृष्टीला समाजमाध्यमांतून फटकारले जात आहे, कारण सरकारचा या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा नाही, असे सांगून जया बच्चन म्हणाल्या, काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण चित्रपटसृष्टीला कलंक लावू शकत नाहीत.
नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीही अमली पदार्थांवर अवलंबून आहे, असे वक्तव्य संसदेत सोमवारी केलेले भाजपचे रवी किशन यांच्यावर समाजवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी टीका केली. रवी किशन हे अभिनेते व उत्तर प्रदेशातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
चित्रपटसृष्टीला समाजमाध्यमांतून फटकारले जात आहे, कारण सरकारचा या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा नाही, असे सांगून जया बच्चन म्हणाल्या, काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण चित्रपटसृष्टीला कलंक लावू शकत नाहीत.
रवी किशन यांचे वक्तव्य हे सध्या देशाची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी या विषयावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी आहे, असा आरोपही बच्चन यांंनी केला.
हिमाचल प्रदेशच्या मंडीचे भाजप खासदार राम स्वरूप शर्मा यांनी महाराष्ट्र सरकार रानौतवर हल्ला करीत आहे, त्यांचे कार्यालयही तोडले गेले. जर त्यांना सुरक्षा नसती तर त्यांच्या जीविताला मोठा धोका झाला असता, असे म्हटले.