coronavirus: तेलंगणात 6 जणांचा मृत्यू, दिल्लीतील जमातच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:36 AM2020-03-31T01:36:24+5:302020-03-31T01:43:48+5:30

याशिवाय दिल्लीत मरकजशी संबंधित आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. याशिवाय 228 संशयीत रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे.

some persons attended a religious prayer meeting markaz in the nizamuddin Among those six died which were from Telangana sna | coronavirus: तेलंगणात 6 जणांचा मृत्यू, दिल्लीतील जमातच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी

coronavirus: तेलंगणात 6 जणांचा मृत्यू, दिल्लीतील जमातच्या कार्यक्रमात झाले होते सहभागी

Next
ठळक मुद्देगेल्या 13 ते 15 मार्चदरम्यान दिल्लीजवळील निजामुद्दीन येथे तब्लिगी मरकजमध्ये झाले होते सहभागीएकूण 252 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहेमरकजमध्ये इस्लामच्या प्रचार-प्रसारासाठी दिले जाते प्रशिक्षण

नवी दिल्ली/हैदराबाद - देशात कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या वाढत चालली आहे. तेलंगणात सोमवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. हे सर्वच्या सर्व कोरोना संक्रमित होते. गेल्या 13 ते 15 मार्चदरम्यान दिल्लीजवळील निजामुद्दीन येथे तब्लिगी मरकजमध्ये ते सहभागी झाले होते. 

याशिवाय दिल्लीत मरकजशी संबंधित आणखी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. याशिवाय 228 संशयीत रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे. यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. अशाप्रकारे एकूण 252 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

कोरोना झालेले हे रुग्ण इंडोनेशिया, मलेशिया आणि जापानलाही गेले होते. तेथून परतल्यानंतर यांपैकी अनेकजण तेलंगणा, तामिळनाडू आणि अंदमानलाही गेले होते. या मरकजमध्ये सहभागी झालेल्या एकूण1600 जणांना निजामुद्दीन येथेच क्वारंटाइन करण्यात आले आहे. यांपैकी ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे जावत आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच काळत मरकजमधील दोन मौलवीविरोधात दिल्ली सरकारने एफआयआर दाखल करण्याचेही आदेश दिले होते.

या मरकजमधून जम्मू-कश्मिरला गेलेल्या सोपोर येथील एका 65 वर्षीय कोरोना संक्रमित व्यक्तीचा 26 मार्चला मृत्यू झाला होता. या निश्काळजीपणाणे आता दिल्लीला संकटात टाकले आहे. कारण या मारकजमध्ये सहभागी झालेले लोक राज्यात अनेक ठिकाणी फिरले आहेत. यामुळेच येथे चार दिवसांत 35 नवे संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. 

इस्लामच्या प्रचार-प्रसारासाठी दिले जाते प्रशिक्षण -

मरकजमध्ये इस्लामच्या प्रचार-प्रसार आणि सुधारणेसंदर्भात नियमितपणे प्रशिक्षण दिले जाते. एकावेळी यात 1500 लोक सहभागी होत असतात. 15 मार्चनंतरही येथे परदेशी लोक आले होते. लॉकडाऊन झाले तेव्हा येथे तब्बल 1500 लोक उपस्थित होते.
 

Web Title: some persons attended a religious prayer meeting markaz in the nizamuddin Among those six died which were from Telangana sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.