काही राजकीय पक्षांकडून माझ्या जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:21 AM2018-05-13T01:21:29+5:302018-05-13T01:21:29+5:30

आपल्या जीवाला काही राजकीय पक्षांकडून धोका आहे. मला मारण्याची सुपारीही देण्यात आली आहे. त्यामुळे मी माझे मृत्युपत्र तयार केले असून

Some political parties risk my life | काही राजकीय पक्षांकडून माझ्या जीवाला धोका

काही राजकीय पक्षांकडून माझ्या जीवाला धोका

Next

कोलकाता : आपल्या जीवाला काही राजकीय पक्षांकडून धोका आहे. मला मारण्याची सुपारीही देण्यात आली आहे. त्यामुळे मी माझे मृत्युपत्र तयार केले असून, माझी हत्या झाल्यास तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असेल, याविषयीही त्यात लिहून ठेवले आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
एका बंगाली वृत्रवाहिनीला दिलेल्या मुलाख़तीत त्या म्हणाल्या की, कोणत्या राजकीय पक्षाकडून माझ्या जीवाला धोका आहे, हे मी सांगणार नाही. पण मी कोणत्या पक्षाविषयी बोलत आहे, हे तुम्हाला समजले असेलच. मला मारण्यासाठी भाडोत्री गुंडांना आधीच पैसे दिले आहेत, अशी माझी निश्चित माहिती आहे. त्यांनी माझ्या घराची रेकीही केली आहे. मात्र मी त्यांना घाबरत नाही.
जे माझ्याशी राजकीयदृष्ट्या लढू शकत नाहीत, तेच याप्रकारचे कृत्य करू पाहत आहे, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट माहिती देण्यास मात्र नकार दिला. त्या म्हणाल्या की हे राजकीय पक्ष प्रथम तुमची प्रतिमा मलिन करतील आणि हत्या केल्यानंतर तेच खोटे अश्रू ढाळण्यात सर्वात पुढे असतील. माध्यमांतील काही लोकांचाही त्यांना पाठिंबा आहे. माझा आवाज दडपून टाकण्यासाठी हे सारे सुरू आहे.

काँग्रेसला बहुमत मिळाल्यास पंतप्रधान होण्यास तयार आहे, या राहुल गांधी यांच्या विधानाबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, असे विधान करण्यात काही अयोग्य नाही. पण काँग्रेसला लोकसभा निवडणुकांत बहुमत मिळणारच नाही. भाजपालाही बहुमत मिळणे अशक्य आहे. प्रादेशिक पक्षांच्या फेडरल फ्रंटची ताकद वाढत आहे. प्रादेशिक पक्षांनी एखाद्या कुटुंबाप्रमाणे या फ्रंटची बांधणी केली आहे. ही फ्रंटच सत्तेवर येऊ शकेल. फ्रंटमधील त्यांच्या भूमिकेबाबत त्या म्हणाल्या की, त्याचे उत्तर देणे मला शक्य नाही. मी सर्वांच्या मतांचा आदर करते. मी अतिशय लहानही आहे

Web Title: Some political parties risk my life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.