काही राज्यांतील सत्ताधाऱ्यांविषयी नापसंती; काही ठिकाणी मतदारांना केंद्रात पुन्हा हवे आहे नरेंद्र मोदी यांचेच सरकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 05:06 AM2019-05-21T05:06:05+5:302019-05-21T05:07:10+5:30

एक्झिट पोलचा अन्वयार्थ : निकालांबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केले असमाधान

Some states dislike about power; At some places voters want again at the center of Narendra Modi's government! | काही राज्यांतील सत्ताधाऱ्यांविषयी नापसंती; काही ठिकाणी मतदारांना केंद्रात पुन्हा हवे आहे नरेंद्र मोदी यांचेच सरकार!

काही राज्यांतील सत्ताधाऱ्यांविषयी नापसंती; काही ठिकाणी मतदारांना केंद्रात पुन्हा हवे आहे नरेंद्र मोदी यांचेच सरकार!

Next

संजीव साबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
एक्झिट पोल म्हणजे एक्जॅक्ट पोल (प्रत्यक्ष निवडणूक निकाल) नसतात. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही तसे स्पष्टपणे बोलून दाखविले आहे. बºयाच विरोधी पक्षांनी एक्झिट पोलवर आपला विश्वास नसल्याचे सांगितले आहे, तर सत्ताधारी भाजपचे नेते आम्हालाच केंद्रात स्पष्ट बहुमत ्मिळेल, असे सांगत असले, तरी पूर्णपणे एक्झिट पोलवर विश्वास ठेवायला तयार नसल्याचे दिसत आहे.


त्यामुळे २३ मे रोजी प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर एक्झिट पोल किती खरे ठरतात, हे कळेलच, पण एक बाब मात्र नक्की. सर्वच एक्झिट पोलनी पुन्हा केंद्रात भाजपप्रणित रालोआची सत्ता येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या निष्कर्षातून किती राज्यांमधील सत्ताधाऱ्यांविषयीची नापसंती मतदारांनी व्यक्त केली आहे आणि किती ठिकाणी राज्यांतील सरकारविषयी नाराजी नाही, पण केंद्रात मोदी सरकारच हवे, या विचाराने मतदान केले आहे, हे पाहायला हवे.


त्याची सुरुवात दक्षिणेकडील राज्यांपासून करावी. येथील तामिळनाडू व केरळ या दोन राज्यांमध्ये कॉँग्रेस व मित्रपक्ष यांची स्थिती चांगली राहील, असे एक्झिट पोल सांगतात. मात्र, एके काळी कॉँग्रेसचे गड असलेल्या अखंड आंध्र प्रदेश व कर्नाटकात मात्र या वेळी कॉँग्रेसचे काही खरे दिसत नाही. इथे १0वा त्याहून अधिक जागा असलेल्या राज्यांचाच हा आढावा आहे. मात्र, गोवा हे राज्य इथे अंतर्भूत आहे. ईशान्येकडील अनेक राज्यांत, तसेच काही केंद्रशासित प्रदेशांत एखाद दोनच जागा आहेत. त्यांचा उल्लेख केलेला नाही.

तामिळनाडू : द्रमुक-काँग्रेस आघाडीला होणार लाभ
तामिळनाडू (३९ जागा) बद्दल बोलायचे, तर तिथे सत्ताधारी अण्णा द्रमुकविषयी खूपच नाराजी दिसत असून, त्याचा फायदा द्रमुकप्रणित व काँग्रेसचा सहभाग असलेल्या आघाडीला (३0 ते ३५) मिळेल, असे एक्झिट पोलमधून दिसते. जयललिता यांच्या निधनानंतर नेत्यांना अण्णा द्रमुक सांभाळता आला नाही, पक्षात फूट पडली, बºयाच नेत्यांवर अद्याप भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याचा परिणाम द्रमुक व मित्रपक्षांना होईल, असे एक्झिट पोल सांगतात. या राज्यातही भाजपची फारशी ताकद नाही.


पश्चिम बंगाल : ममता यांच्याबाबत जनता नाराज
पश्चिम बंगाल (४२ जागा) मध्ये २0१४ साली तृणमूल काँग्रेसने ३४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ४, तसेच डावे पक्ष व भाजपला प्रत्येकी २ जागा मिळाल्या होत्या. आता भाजपला १५ ते २२ जागा मिळतील, असे एक्झिट पोल सांगतात. ही ममता बॅनर्जी सरकारविषयीची नाराजी असू शकते, तसेच तिथे काँग्रेस व डावे पक्ष संपल्यात जमा असून, ती जागा भाजपने घेतली आहे, असाही एक अर्थ लावता येईल. अर्थात, यंदा नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपच्या सर्वच नेत्यांनी तिथे सारी ताकद लावली होती.


राजस्थान : गेहलोत सरकारविरोधात कौल?
राजस्थानमध्ये (२५ जागा) काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. भाजपला दूर करून मतदारांनी काँग्रेसला सत्ता दिली, पण लोकसभा निवडणुकीत मात्र तेथील मतदार भाजपच्या बाजूने (सुमारे २३ जागा) गेल्याचे एक्झिट पोलमधून दिसत आहे. अशोक गेहलोत सरकारविषयीची ही नाराजी आहे की राज्यात सत्ताबदल, पण केंद्रात मोदी सरकार असा विचार मतदारांनी केला, हे समजायला मार्ग नाही.
उत्तर प्रदेशात :भाजप, मित्रपक्षांच्या जागांमध्ये घट
उत्तर प्रदेशात (८0 ) जागा असून, त्यापैकी ७३ जागा २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी जिंंकल्या होत्या. त्या वेळी सप, बसप, काँग्रेसचा धुव्वा उडाला होता. विधानसभा निवडणुकीतही भाजपला भरघोस मते व बहुमत मिळाले. त्यानंतर, हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने पोटनिवडणुकांत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे यंदा सप-बसप-रालोद यांनी आघाडी केली. मतविभाजन टाळण्यासाठीच हे केले. त्यामुळे यंदा भाजप-व मित्रपक्षाच्या जागांत २५ ते ४0 ने घट होईल, असे एक्झिट पोलने म्हटले आहे. अर्थात, योगी आदित्यनाथ सरकारविषयीही काही नाराजी असल्याचे
एक्झिट पोल सांगतात.
मध्य प्रदेश : मोदींना पुन्हा संधी देणार
मध्य प्रदेशातही (२९ जागा) नेमके हेच चित्र आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुकाही राजस्थानबरोबरच झाल्या. तिथेही मतदारांनी भाजपच्या हातून सत्ता काढून ती काँग्रेसला दिली, पण आता केंद्रात त्यांना भाजपच (२६ जागांचा अंदाज) हवे आहे, असे एक्झिट पोल सांगतात. मध्य प्रदेशात १५ वर्षांनी आम्ही भाजपला दूर केले, पण केंद्रात मोदी सरकारला आणखी एक संधी द्यायला हवी, असा मतदारांचा कौल दिसतो.

आंध्र प्रदेश : चंद्राबाबू यांच्याविषयी नाराजी
आंध्र प्रदेशात (२५) मात्र चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमविषयी नाराजी असून, त्याचा फायदा जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला (१८ ते २0) मिळेल, असे हे सध्याचे एक्झिट पोल सांगत आहेत. तिथेही काँग्रेस वा भाजप हे मोठे फॅक्टर नाहीत. त्यामुळे सामना झाला तो टीआरएस व वायआरएस काँग्रेसमध्येच. टीडीपीला ४ ते ६ जागांचा अंदाज आहे.
छत्तीसगड : केंद्रात मात्र हवे भाजपचे सरकार
छत्तीसगडमध्येही (११ जागा) अलीकडेच सत्तापरिवर्तन झाले. भाजपकडून सत्ता काँग्रेसला मिळाली, पण तेथील मतदार लोकसभेसाठी भाजप व मोदींनाच (७ ते ८ जागा) पाठिंबा देतात, असे एक्झिट पोल दर्शवित आहेत. तिन्ही राज्यांत एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि तेव्हा भाजपला दूर करणारे मतदार आता मात्र भाजपलाच मते देतात, याचे कारण केंद्रात त्यांना भाजपच हवा असावा.

कर्नाटक : जेडीएस सरकारवर संताप
कर्नाटकात (२८ जागा) जनता दल (धर्मनिरपेक्ष) व काँग्रेस आघाडीचे सरकार असून, एक्झिट पोलमधून त्या सरकारवर मतदार खूश नसून, त्यांनी भाजपला अधिक जागा (२१ ते २५) देण्याचे ठरविल्याचे दिसते. सत्ताधारी आघाडीतील दोन पक्षांमधील सतत उफाळून येणारे वाद हे मतदारांच्या नाराजीचे कारण असू शकते.

हरयाणा : खट्टर सरकारवर राग
हरयाणामध्येही मनोरलाल खट्टर सरकारविषयी नाराजी नसावी. तेथील १0 पैकी ८ जागा भाजपला मिळू शकतात, असे एक्झिट पोल सांगतात. अर्थात, तिथे लोक दलात पडलेली फूट, काँग्रेसमधील धुसफुस, माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांच्यावरील आरोप याचा फटका काँग्रेसला बसणार असावा.
गोवा : भाजपला सहानुभूतीचा लाभ
गोव्यात दोनच जागा असल्या, तरी त्या दोन्ही भाजपला मिळतील, असे एक्झिट पोल सांगतात. खिळखिळी झालेली काँग्रेस, विश्वासार्हता व भाजपला पर्याय ठरू शकत नसलेले नेतृत्व, भाजपची व्यवस्थित संघटना व मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे भाजपविषयी सहानुभूती याचा हा परिणाम असावा.
पंजाब: अमरिंदर सरकारवर खूश
(१३ जागा) मात्र काँग्रेस नेते व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविषयी नाराजी वा संताप अजिबात दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसला ८ ते १0 जागा मिळतील, असे हे पोल दर्शवतात. अकाली दलाविषयी नाराजी व भाजपचे मजबूत नसलेले संघटन याचाही तो परिणाम असू शकतो.
तेलंगणा : राव यांच्याबाबत प्रेम
तेलंगणामध्ये (१७ जागा) अलीकडेच विधानसभा निवडणुका झाल्या आणि तेलंगणा राष्ट्र समितीला भरघोस मते व स्पष्ट बहुमत मिळाले. तेथील मतदार अद्यापही टीआरएस व मुख्यमंत्री क. चंद्रशेखर राव यांच्या प्रेमात असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत असून, त्यांना १0 ते १२, त्यांचा मित्रपत्र एमआयएमला १ मिळण्याची शक्यता दिसते.
गुजरात : रुपाणींचे काम पसंतीस
गुजरातमध्येही (२६ जागा) अलीकडेच विधानसभा निवडणुका झाल्या. तिथे भाजपची संघटना मजबूत आहे आणि मुख्यमंत्री विजय रूपाणी सरकारविषयी नाराजी नसल्याने भाजप कदाचित पैकीच्या पैकी जागा (२५ ते २६) मिळवेल, असे एक्झिट पोल दर्शवतात.

आसाम : भाजपला स्पष्ट कौल
आसाम (१४ जागा) मध्येही भाजपलाच ८ ते १०) जागा मिळतील, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. म्हणजेच तेथील सर्वानंद सोनोवाल यांच्या सरकारबद्दल लोकांची नाराजी दिसत नाही किंवा तेथील जनतेलाही केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकार हवे आहे, असे दिसते. तिथे भाजपचा सामना कॉँग्रेसशी आहे.
बिहार : नितीशकुमार यांच्याबाबत समाधान
बिहारमध्ये (४0 जागा) विधानसभा निवडणुका झाल्या २0१५ मध्ये. त्यावेळी राजद-जद (यू) व काँग्रेस यांना सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे सरकार बनले आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. भाजप विरोधात होता.
पण दोनच वर्षांत नितीश कुमार यांनी राजद व काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपशी मैत्री करून सरकार बनविले. त्यामुळे मतदारांना ते आवडले नसावे, असे सांगण्यात येत होते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकांसाठी राजदने कॉँग्रेस व अन्य पक्षांशी महाआघाडी केली, पण त्याचा फायदा महाआघाडीला होत असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत तरी नाही. बिहारमधील ४0 पैकी ३५ ते ३८ जागा भाजप-जदयूला मिळतील, असे एक्झिट पोल सांगतात. म्हणजे तिथे नितीश कुमार सरकारविषयी नाराजी नसावी वा मतदारांना केंद्रात मोदी सरकारच हवे असावे. अर्थात कॉँग्रेस व राजद एकत्र आल्याने मतविभाजन टळेल हा अंदाजही चुकीचा ठरेल, असे वाटते.

केरळ : शबरीमालाचा भाजपला लाभ नाहीच
केरळ (२0 जागा) राज्यात डाव्यांचे सरकार आहे आणि तिथे भाजपला फार स्थान नाही. तिथे शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशावरून भाजपने

Web Title: Some states dislike about power; At some places voters want again at the center of Narendra Modi's government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.