हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 09:33 PM2020-05-03T21:33:38+5:302020-05-03T22:07:59+5:30

अनुज सुद यांचे शालेय शिक्षण पंजाब पब्लिक स्कूल, नाभा येथून झाले. शाळेत ते अत्यंत हुशार होते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये अनुज यांची निवड झाली होती. मात्र, त्यांनी आयआयटीचा मार्ग सोडून एनडीएचा मार्ग निवडला होता.

Some thing about major anuj sood who martyred in jammu kashmir handwara terrorist encounter sna | हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग

हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग

Next
ठळक मुद्देमेजर अनुज यांचे वडील सीके सूद हे लष्करात ब्रिगेडियर होते इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये (आयआयटी) अनुज यांची निवड झाली होतीअनुज सूद यांची छोटी बहीण सैन्यात आहे

नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवानांना हौतात्म्य आले. या चकमकीत हौतात्म्य आलेल्या जवानांतील एक नाव म्हणजे मेजर अनुज सूद. मेजर अनुज हे ब्रिगेड ऑफ गार्ड्सचे अधिकारी होते. या वीर अधिकाऱ्याचे भारतीय लष्कराशी फार जुनेच नाते होते. त्यांचे वडील सीके सूद हे  लष्करात ब्रिगेडियर होते. मेजर अनुज हे हरियाणातील पंचकुला येथील होते.

अनुज सुद यांचे शालेय शिक्षण पंजाब पब्लिक स्कूल, नाभा येथून झाले. शाळेत ते अत्यंत हुशार होते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये (आयआयटी) अनुज यांची निवड झाली होती. मात्र, त्यांनी आयआयटीचा मार्ग सोडून एनडीएचा मार्ग निवडला होता.

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

एनडीएमध्ये मेजर सूद यांनी विक्रम प्रस्थापित केला होता. ते 6 वेळा शिस्त आणि इंटेलिजन्समुळे अव्वल ठरले. इन्फंट्रीमॅन असूनही त्यांनी आयआयएससी बंगळुरू येथून एमटेक केले. यात ते डिस्टिंक्शनमध्येही आले होते.

2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह -
मेजर अनुज सूद यांचा विवाह 2 वर्षांपूर्वीच हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील आकृती यांच्याशी झाला होता. सध्या त्यांना कुठलेही मूल नाही. मेजर सूद यांची पत्नी पुण्यातील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कार्यरत आहे. मेजर अनुज यांचे वडील ब्रिगेडियर सीके सूद अमरावती एन्क्लेवमध्ये राहतात. 

बहीणही सैन्यात -
मेजर अनुज यांची आई सुमन या यमुनानग येथील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांची एक मोठी बहीण ऑस्ट्रेलियात राहते. तर छोटी बहीण सैन्यात आहे.

CoronaVirus News : 'या'मुळे घेण्यात आला 3 मेनंतरही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय, नीती आयोगाने सांगितले 'असे' कारण

पंचकुला येथेच होईल अंत्यविधी -

सूद कुटुंबीय 8 महिन्यांपूर्वीच पंचकुला येथील अमरावती एन्क्लेवमध्ये राहण्यासाठी आले होते. मेजर अनुज यांचे पार्थिव सोमवारीच पंचकुला येथे पोहोचेल. येथील मनीमाजरा येथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर

Web Title: Some thing about major anuj sood who martyred in jammu kashmir handwara terrorist encounter sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.