'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की'; हवाई दलाकडून पाकिस्तान ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 02:14 PM2019-03-08T14:14:04+5:302019-03-08T14:40:33+5:30
'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की', अशी ही कविता मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या फोटोवर घेऊन पोस्ट केली आहे.
मुंबई : गेल्या महिन्यात पुलवामामध्ये झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला होता. एलओसी पार करून पाकिस्तानमधील जैशचे तळ उद्ध्वसत केले होते. यावरून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला ट्विटरवर कविता पोस्ट करून ट्रोल केले आहे. 'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की', अशी ही कविता मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या फोटोवर घेऊन पोस्ट केली आहे.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेला हल्ला जगभरात चर्चेला आला आहे. सर्जिकल स्ट्राईक 2 असे या मोहिमेला नाव दिले होते. 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन हा प्रेमसंदेशांनी भारलेला दिवस साजरा होत होता. तेव्हा दुपारी 3.30 च्या सुमारास जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने 2500 सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला होता. भारतासाठी हा दिवस काळा दिवस ठरला होता. या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यामुळे देशभरातून पाकिस्तानचा बदला घेण्याच भावना व्यक्त होऊ लागली होती. अखेर 13 व्या दिवशी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून जैशचे मुख्यालय आणि दहशतवाद्यांचे तळ 1000 किलोचे बाँम्ब टाकून उद्ध्वस्त केले होते.
हद सरहद की
— Indian Air Force (@IAF_MCC) March 8, 2019
आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।
उस लड़ाकू में, जिसका अर्थ मृगमरीचिका है,
एक हक़ीक़त, गयी रात हमने बयाँ की।
आज किसी ने सरहदें पार की...
. .. विपिन 'इलाहाबादी', २७ फरवरी २०१९ pic.twitter.com/9nymkFLzhk
या हल्ल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ 16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावला होता. यामध्ये पाकचे एक विमानही पाडण्यात आले होते. तसेच भारताचे मिग 21 बायसन हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. पायलट अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसांनंतर भारताच्या हवाली केले होते.
आज भारतीय हवाई दलाने देशभक्तीपर कविता पोस्ट करून पाकिस्तानला ट्रोल केले आहे. 27 फेब्रुवारीला विपिन इलाहाबादी यांनी ही कविता लिहीली होती.
हद सरहद की
आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।
उस लड़ाकू में, जिसका अर्थ मृगमरीचिका है,
एक हक़ीक़त, गयी रात हमने बयाँ की।
आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।
आज उसके पाले में जा के,
कहा हमने 'हू तू तू तू तू तू'।
और एक ख़ास तरीके से उसे छूकर,
कहा 'अब बस! संभल जा तू'।
आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।
अब नींद कैसे आएगी उनको,
थोड़ा सा झकझोर आये हैं उनको।
रात जैसे जैसे रवानी पर पहुंचेगी,
आतिशबाजी का रहेगा अंदेशा उनको।
आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।
अब झूठ कैसे और किससे बोलेंगे वो,
सच की एक ख़ुराक खिला आये हैं उनको।
मियाँ, तुम तुम हो, हम हम हैं,
आज सुबह बता आये हैं उनको।
आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।
बयाँ की है अपनी मंशा अपनी ज़रा हट के,
हो जाये मुकाबला इस बार चाहे डट के।
आज किसी ने अपनी सरहदें पार कीं,
क्योंकि किसी ने सारी हदें पार कीं।
विपिन 'इलाहाबादी'
२७ फरवरी २०१९