कुणाला पैशाची तर कुणाला परिवाराची चिंता - मोदींचा घणाघात

By admin | Published: January 2, 2017 03:25 PM2017-01-02T15:25:18+5:302017-01-02T17:39:14+5:30

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विराट सभेचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन केले.

Someone's concern about money and the family's concern - Modi's suffocation | कुणाला पैशाची तर कुणाला परिवाराची चिंता - मोदींचा घणाघात

कुणाला पैशाची तर कुणाला परिवाराची चिंता - मोदींचा घणाघात

Next

 ऑनलाइन लोकमत

लखनऊ, दि. 2 -   लाखोंच्या उपस्थितीत झालेल्या परिवर्तन सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस, बहुजन समाजावादी पक्ष आणि सपवर नाव न घेता घणाघाती टीका करत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. "उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळे पक्ष आपापले स्वार्थ साधण्यात गुंतले आहेत,  राज्यात नाममात्र उरलेला पक्ष आपल्या नेत्यासाठी राजकीय जमीन तयार करण्यासाठी धडपडतो आहे. तर एक पक्ष पैसे कुठल्या बँकेत जमा करायचे या चिंतेत आहे. या बँकेतून त्या बँकेत त्यांची पळपळ सुरू आहे, तर आणखी एक पक्ष आपले तुटणारे कुटुंब कसे वाचवाचये या चिंतेत आहे." अशा शब्दात मोदींनी काँग्रेस, बसप, सपवर टीका केली.  
यावेळी उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विराट सभेचे आयोजन करून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या आठवणीने सभेला सुरुवात केली. 
कुटुंबकलहाने ग्रासलेला समाजवादी पक्ष, उत्तर प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी मोर्चेबांधणी करत असलेला बसप आणि आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या काँग्रेसला मोदींनी आपल्या खास शैलीत लक्ष्य केले. "सप आणि बसपचे कुठल्याही गोष्टीवर एकमत होत नाही, पण  मोदींना हटवण्यावर त्यांचे एकमत आहे.  मी काळेधन हटवा, काळा पैसा हटवा, असे सांगत आहे, तर माझे विरोधक म्हणताहेत की मोदींनाच हटवा. देशाला संबोधित करताना योजनांची घोषणा केली, तेव्हाही काही लोकांना अडचण झाली. मोदीने पैसे घेतले तरी यांना त्रास आणि दिले तरीही यांना त्रास होतो." अशी टीका मोदींनी केली. 
यावेळी सध्या कौटुंबिक वादात अडकलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही मोदींनी टीका केली. "केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळाल्यानंतरही उत्तर प्रदेश सरकारला शेतकऱ्यांकडून धान्यखरेदीला वेळ मिळत नाही. हे योग्य नाही.  उत्तर प्रदेशची स्थिती बदलण्यासाठी राज्यात सत्तपरिवर्तन आवश्यक आहे,"  असे मोदी म्हणाले.  तसेच मला कुण्या हायकमांडच्या घरी जावे लागत नाही,  देशातील सव्वाशे कोटी जनताच माझी हायकमांड आहे, असा टोलाही मोदींनी लागवला.
"उत्तर प्रदेशमध्ये भाजप गेल्या 14 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे, पण भाजपचा हा वनवास राज्याच्या विकासाचा वनवास ठरला आहे. जनतेकडून उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या सरकारांची, आताच्या सरकारांशी तुलना  होते. देशाचा विकास व्हावा. देशातून गरिबी मिटावी, ही आमची इच्छा. मात्र जोपर्यंत उत्तर प्रदेशचा विकास होत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. देशाचा विकास होण्यासाठी उत्तर प्रदेशचा विकास होणे आवश्यक आहे," असे मोदीनी सांगितले.  मात्र सत्तापरिवर्तन करताना अल्पमतातील सरकार बनवू नका तर  पूर्ण बहुमताने भाजपच्या हाती सत्ता द्या असे आवाहनही त्यांनी केले. 
 
 Hindustan ka bhagya badalne ke liye pehli shart hai ki humein Uttar Pradesh ka bhaagya badalna padega: PM Modi pic.twitter.com/1KfgUQO3FN

Web Title: Someone's concern about money and the family's concern - Modi's suffocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.