पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 05:06 PM2020-05-07T17:06:20+5:302020-05-07T17:17:12+5:30

पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादवर अवैधरित्या ताबा मिळविला आहे. मंगळवारी आयएमडीने या भागाचा समावेश अनुमानामध्ये केला आहे.

Something big is going to happen in Pakistan-occupied Kashmir?; Sign of IMD hrb | पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा

Next

नवी दिल्ली : भारताने दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानला गिलगिट-बाल्टिस्तान तत्काळ खाली करण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानला तिथे अनधिकृतरित्या ताबा घेतल्याचे सुनावले होते. आज भारताने या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. भारतीय हवामान विभागाने जम्‍मू-काश्‍मीरच्या सब डिव्हीजनला आता  जम्‍मू आणि कश्‍मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबाद म्हणण्यास सुरुवात केली आहे. 


पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादवर अवैधरित्या ताबा मिळविला आहे. मंगळवारी आयएमडीने या भागाचा समावेश अनुमानामध्ये केला आहे. या अनुमानामध्ये गिलगिट-बाल्टिस्‍तान आणि मुजफ्फराबादचा उल्लेख करणे भारताचे मोठे पाऊल मानले जात आहे. भारताने या भागावर पाकिस्तानला कोणताही हक्क नसल्याचे म्हटले होते. पाकिस्तानी न्यायालयाने या ठिकाणी निवडणूक घेण्याचा निर्णय दिला होता. यानंतर भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तांना बोलावून सुनावले होते. 


गिलगिट बाल्टिस्तानवरून पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला बोलावून परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याला जम्मू काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाख हे भारताचे अधिकृत क्षेत्र आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानवर अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे. यामुळे त्यांना न्यायपालिकेद्वारे निर्णय घ्यायचा अधिकार नाही. जम्मू काश्मीरचा भागही तात्काळ खाली करावा अशा शब्दांत पाकिस्तानला सुनावले आहे. 

महत्वाच्या बातम्या...

रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात

कल्याणमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयला कोरोना; आज २० रुग्ण सापडले

Web Title: Something big is going to happen in Pakistan-occupied Kashmir?; Sign of IMD hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.