माजी लोकसभा अध्यक्ष 'सोमनाथ चटर्जी व्हेंटिलेटरवर'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 12:42 PM2018-08-12T12:42:51+5:302018-08-12T12:59:21+5:30

लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांची तब्येत अधिकच खालावली आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Somnath Chatterjee on ventilator support, condition critical | माजी लोकसभा अध्यक्ष 'सोमनाथ चटर्जी व्हेंटिलेटरवर'

माजी लोकसभा अध्यक्ष 'सोमनाथ चटर्जी व्हेंटिलेटरवर'

Next

कोलकाता - लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांची तब्येत अधिकच खालावली आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. 

सोमनाथ चटर्जी यांना गेल्या अनेक दिवसांपासून मुत्रपिंडाचा त्रास सुरू आहे. त्यामुळे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. यापूर्वी 28 जून रोजी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. सोमनाथ चटर्जी यांनी सीपीएम पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सन 1968 ते 2008 पर्यंत त्यांनी पक्षाचे कार्यकर्ता ते नेता म्हणून सक्रियपणे कामकाज पाहिले. तर 1971 मध्ये पहिल्यांदा ते खासदार बनून संसदेत पोहोचले होते. तब्बल 10 वेळा ते खासदार राहिले आहेत. 


दरम्यान, सन 2008 साली भारत-अमेरिका परमाणू करार विधेयकावेळी सीपीएमने तत्कालीन डॉ. मनमोहनसिंग सरकारचे समर्थन काढून घेतले होते. त्यावेळी, सोमनाथ चटर्जी लोकसभा अध्यक्ष होते. यावेळी पक्षाने त्यांना अध्यक्षपद सोडण्याची सूचना केली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे सीपीएमने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून त्यांची हकालपट्टी केली होती. 

Web Title: Somnath Chatterjee on ventilator support, condition critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.