गोल्ड मॉनेटायझेशन स्कीममध्ये सोमनाथ मंदीर गुंतवणार सोने
By Admin | Published: January 18, 2016 01:56 PM2016-01-18T13:56:31+5:302016-01-18T14:10:02+5:30
सरकारच्या गेल्ड मॉनेटायझेशन योजनेमध्ये गुजरातमधील सोमनाथ मंदीर सोनं गुंतवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदीराच्या विश्वस्तांमध्ये असून नुकतीच विश्वस्त मंडळाने यास अनुमती दिली आहे
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १८ - सरकारच्या गोल्ड मॉनेटायझेशन योजनेमध्ये गुजरातमधील सोमनाथ मंदीर सोनं गुंतवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदीराच्या विश्वस्तांमध्ये असून नुकतीच विश्वस्त मंडळाने यास अनुमती दिली आहे. सरकारच्या गोल्ड मॉनेटायझेशन स्कीममध्ये सोनं गुंतवणारे सोमनाथ मंदीर गुजरातमधील पहिलेच मंदीर ठरणार आहे.
मंदीराकडे वेगवेगळ्या स्वरुपात सुमारे ३५ किलो सोने आहे. यापैकी जे दैनंदिन वापरामध्ये लागत नाही असे सोने या योजनेत ठेवण्याचा ट्रस्टचा विचार आहे. यासाठी सगळ्या विश्वस्तांनी सहमती दर्शवली असल्याचे सचिव पी. के. लाहिरी यांनी सांगितले. मंदीराच्या ताब्यात असलेले सोने दागिने व शुद्ध सोने स्वरुपात आहे. यापैकी शुद्ध सोने वेगळे करून किती सोने या योजनेत ठेवता येईल याचा अंदाज घेण्यात येणार आहे.
याआधी शिर्डी देवस्थान आणि सिद्धीविनायक ट्रस्ट यांनीदेखील सरकारच्या गोल्ड मॉनेटायझेशन योजनेत सोने ठेवण्यास तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे.