प्रेमासाठी काय पण! आईच्या आठवणीत लेकाने बांधला 'ताजमहाल'; केला कोट्यवधींचा खर्च, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:37 AM2023-06-12T10:37:18+5:302023-06-12T10:38:02+5:30

आपल्या आईच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालची प्रतिकृती बनवली आहे.

Son builds Taj Mahal-inspired memorial house for dead mother | प्रेमासाठी काय पण! आईच्या आठवणीत लेकाने बांधला 'ताजमहाल'; केला कोट्यवधींचा खर्च, म्हणाला...

प्रेमासाठी काय पण! आईच्या आठवणीत लेकाने बांधला 'ताजमहाल'; केला कोट्यवधींचा खर्च, म्हणाला...

googlenewsNext

प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से देखील नेहमी पाहायला मिळतात. लोक प्रेमाच्या किंवा प्रियकर, प्रेयसीच्या आठवणी अमर करण्यासाठी वेगळं असं काहीतरी करतात जेणेकरून जग त्यांना लक्षात ठेवेल. मुघल सम्राट शाहजहाननेही असंच काहीसं केलं आणि आपली प्रिय पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. आता एका व्यक्तीने असंचं केलं आहे मात्र त्याने ते आपल्या आईच्या प्रेमापोटी केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडूतील तिरुवरूर जिल्ह्यातील एका मुलाच्या प्रेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. अमरुद्दीन शेख दाऊद असं या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या आईच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालची प्रतिकृती बनवली आहे. त्याची ही कृती सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असून चर्चेचा विषय ठरली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिरुवरूर येथील रहिवासी अमरुद्दीन शेख दाऊदची आई जेलानी बीवी यांचं 2020 मध्ये निधन झालं. अमरुद्दीन आपल्या आईवर खूप प्रेम करायचा आणि त्याला आईच्या निधनाचा खूप मोठा धक्का बसला. अमरुद्दीनच्या वडिलांचं 1989 मध्ये निधन झालं होतं, तेव्हापासून फक्त त्याच्या आईने 5 मुलांना वाढवलं. तो त्याच्या आईला प्रेम आणि शक्तीचं प्रतीक मानतो कारण लहान वयात वडिलांचं निधन झाल्यानंतरही त्याच्या आईने दुसरं लग्न केलं नाही.

2020 मध्ये आईच्या मृत्यूनंतर अमरुद्दीनने तिला कब्रस्तानाऐवजी स्वतःच्या जमिनीवर पुरले आणि तिच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधले. ड्रीम बिल्डर्सच्या मदतीने त्याने ताजमहालची प्रतिकृती बनवली. त्याचे बांधकाम 3 जून 2021 रोजी सुरू झाले. 200 हून अधिक मजुरांनी यासाठी काम केलं आणि 8000 स्क्वेअर फूटमध्ये ताजमहालची प्रतिकृती बनवली. या कामात साडे 5 कोटींहून अधिक रुपये खर्च झाले. त्याने ही इमारत एका चॅरिटेबल ट्रस्टला दान केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Son builds Taj Mahal-inspired memorial house for dead mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.