जेईईत कम्पाऊंडरचा मुलगा आला पहिला

By admin | Published: April 27, 2017 05:59 PM2017-04-27T17:59:36+5:302017-04-27T17:59:36+5:30

सीबीएसईनं आज जेईई मेन 2017 या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

The son of the Compounder came in JEET | जेईईत कम्पाऊंडरचा मुलगा आला पहिला

जेईईत कम्पाऊंडरचा मुलगा आला पहिला

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27- सीबीएसईनं आज जेईई मेन 2017 या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. जेईईमधल्या प्रवेश परीक्षेत राजस्थानमधील कल्पित वीरवाल हा मुलगा देशातून पहिला आला आहे. कल्पितला जेईई प्रवेश परीक्षेत 360 पैकी 360 असे पूर्ण गुण मिळाले आहेत. वीरवाल हा आता 17 वर्षांचा आहे. वीरवाल याचे वडील उदयपूरमधल्या महाराणा भूपल सरकारी रुग्णालयात कम्पाऊंडरची नोकरी करतात. तसेच आई एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. कल्पितचा भाऊ एम्समधून मेडिकलच्या अभ्यासाचे धडे गिरवतो आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, वीरवालला ही आनंदवार्ता सीबीएसईचे चेअरमन आर. के. चतुर्वेदी यांनी फोनवरून सांगितली आहे. कल्पित हा सर्व कॅटेगरीत टॉपर आहे. कल्पित म्हणाला, टॉपर होणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र या परिस्थितीला मी सामान्यपणे घेतोय. आता मी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी मेहनत घेतोय.

दरम्यान, एमडीएस खासगी शाळेतून कल्पितनं 12वीची परीक्षा दिली आहे. त्याचा निकाल येणं अजून बाकी आहे. स्वतःच्या यशासाठी कल्पितनं रेजोनन्स अ‍ॅडव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, उदयपूरचे शिक्षक आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त वीरवालला क्रिकेट, बॅडमिंटन आणि गाण्याचीही आवड आहे.

Web Title: The son of the Compounder came in JEET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.