कौतुकास्पद! अमूल कंपनीतील ड्रायव्हरचा मुलगा बनला दिग्गज डेअरी कंपनीत मोठा अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 09:07 PM2021-05-20T21:07:58+5:302021-05-20T21:09:42+5:30
Inspirational story: अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत या तरुणाने मिळवले कौतुकास्पद यश...
नवी दिल्ली - आयआयएम अहमदाबादमधून हल्लीच झालेल्या प्लेसमेंटमधून २४ वर्षांच्या हितेश सिंह याची कंट्री डिलाइट कंपनीमध्ये असोसिएट मॅनेजर (नवीन उत्पादने) या पदासाठी निवड झाली आहे. हितेश सिंह याची डेअरी सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा होती. हे यश हितेश आणि त्याच्या वडिलांसाठी स्वप्नपूर्तीसारखे आहे. कारण हितेशचे वडील पंकज सिंह हे अमूल कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत.
हितेश हा गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिडेटमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या आरएसएस सोढी यांनी आपले रोड मॉडेल मानतो. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याला पुढे जायचे आहे. हितेश याने गुजराती माध्यमातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर १२वीमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स या विषयांमध्ये ९७ टक्के गुण घेतले. शाळेच्या दिवसांपासून स्कॉलरशिपच्या मदतीवर शिक्षण घेणाऱ्या हितेशने कधीही क्लासची मदत घेतली नाही. डेअरी सायन्समधून बीटेकमध्ये डेअरी टेक्नॉलॉजी या विषयात अव्वल क्रमांक पटकावला होता.
हितेशचे वडील पंकज सिंह हे संपूर्ण कुटुंबासह बिहारमधून येऊन गुजरातमधील आणंद येथे येऊन स्थायिक झाले होते. त्यांनी सुरुवातीच्या दिवसांमध्ये सुरक्षारक्षकाचे काम हेले. ज्यामध्ये त्यांना दरमहा ६०० रुपये पगार मिळत होता. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी ड्रायव्हिंग शिकून नोकरी केली. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने हितेशने कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले. आयआयएम अहमदाबाद येथून त्याने फूट अँड अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्याने पदव्युत्तर पदवी घेतली. त्यासाठी त्याला स्कॉलरशिप मिळाली होती.