कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 02:44 PM2020-12-12T14:44:17+5:302020-12-12T16:07:30+5:30
Farmers Protest : "माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत"
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याच दरम्यान सिंघू बॉर्डरवर शकील मोहम्मद कुरेशी कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करत आहेत.
शकील मोहम्मद कुरेशी शेतकऱ्यांना मोफत स्वेटर वाटत आहेत. दररोज सकाळी आठ वाजता कुरेशी रस्त्याच्या कडेला आपला स्टॉल लावतात आणि स्थानिक ठिकाणी तयार केलेले स्वेटर नव्या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मोफत वाटत आहेत. कुरेशी यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचं वाटप केलं आहे. कुरेशी हे गरम कपडे विकण्याचे काम करतात. ते दररोज 2500 रुपयांची कमाई करतात.
कुरेशी यांचे वडील हे उत्तर प्रदेशातील बागपत येथील शेतकरी आहेत. "माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत" असं कुरेशी यांनी म्हटलं आहे. ते आपली पत्नी आणि मुलांसह उत्तर दिल्लीतील नरेला येथे राहतात. कुरेशी यांनी गरम कपड्यांच्या किंमतीविषयी काही बोलायला नकार दिला. हे चांगल्या कामासाठी माझं योगदान आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
"सरकार न्याय देण्यात असमर्थ, जे शेतकरी देशासाठी लढत जीव अर्पण करतात, ज्यांची मुलेही देशासाठी शहीद होतात, त्यांना देशद्रोही दाखण्याचा प्रयत्न करू नका"https://t.co/XGewOcTG14#RaosahebDanve#FarmerProtest#FarmLaws#FarmerBill2020pic.twitter.com/mud5AgoxMS
— Lokmat (@MiLOKMAT) December 10, 2020
सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी समाजातील विविध वर्गांमधून विविध प्रकारची मदत पोहोचत आहे. काही व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटना लंगर आयोजित करत आहेत, तर काही दररोज लागणाऱ्या गरजा भागवण्याचे काम करत आहेत. काहींनी तर वैद्यकीय शिबिरे देखील लावली आहेत. काही लोक तर भांडी घासण्याचे काम करत आहेत, तर काही कचरा देखील साफ करताना दिसत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. कारण शेतकऱ्यांच्या या अवस्थेला ते जबाबदार आहेत"https://t.co/yThCpnT5nj#FarmersProtest#FarmBills2020#Congress#SharadPawar#RahulGandhi#BJPpic.twitter.com/pH6ZuH3K6E
— Lokmat (@MiLOKMAT) December 9, 2020