कलेने केलं मोठं! 10वी पर्यंत शिक्षण, आज Handloom व्यवसायातून 'ती' कमवते तब्बल 12 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 05:07 PM2023-02-25T17:07:18+5:302023-02-25T17:14:28+5:30

हस्तकला आणि हातमाग क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

son help mother handloom business education now earning good | कलेने केलं मोठं! 10वी पर्यंत शिक्षण, आज Handloom व्यवसायातून 'ती' कमवते तब्बल 12 लाख

फोटो - NBT

googlenewsNext

ज्योती गोडक्या यांनी हस्तकला आणि हातमाग क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आता त्या आपली कला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. हातमागातून वर्षाला 12 लाखांहून अधिक उलाढाल करत असलेल्या ज्योती गोव्याच्या रहिवासी आहेत. ज्योती यांनी यामागे खरी मेहनत 18 वर्षांचा मुलगा जय याची असल्याचं सांगितलं आहे. त्यांचं फक्त दहावीपर्यंतच शिक्षण झालं आहे.

एका सर्वसामान्य कुटुंबातील ज्योती सांगतात की, मी फारशी शिकलेली नाही, पण सुरुवातीपासूनच मला हँडमेड एम्ब्रॉयडरी, एपलिक, पॅचवर्क, बेडशीट, सोफा कव्हर बनवण्याची आवड होती. 2002 मध्ये लग्न झाले. नवरा छोट्या जत्रेत दुकान थाटायचा. कुटुंबाच्या बिकट परिस्थितीमुळे मन काही तरी करायच्या आधी विचार करायचं. याच दरम्यान, मुलगा जयला आईची कलाकुसर लक्षात आली. 

गेल्या वर्षी जयने 11 महिलांना जोडून श्री राष्टोरी बचत गटाची स्थापना केली. स्त्रिया आपली बचत जोडून एपलिक, पॅचवर्क, बेडशीट, सोफा कव्हर इत्यादी वस्तू बनवू लागल्या. फोन कसा वापरायचा हे मुलानेच शिकवले. ती आपल्या पतीसह बाजारात या उत्पादनांचे स्टॉल लावत असे आणि हळूहळू तिच्या व्यवसायाला गती मिळाली. ज्योती यांनी सांगितले की, जयने फोनवर खूप काही शिकवले आहे. 

ज्योती यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वेळ अशी होती जेव्हा संपूर्ण स्टॉक कधीच संपायचा नाही. आता सरस मेळ्यात ज्योतीने आणलेला माल संपण्याच्या मार्गावर आहे. ज्योतीने मालाची ऑर्डर दिली आहे. वाहतुकीऐवजी ज्योती तिचा माल ट्रेनने आणत आहे, जेणेकरून माल लवकरात लवकर तिच्या स्टॉलवर पोहोचू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: son help mother handloom business education now earning good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.