Rishi Sunak: जावई ब्रिटिशांचा पंतप्रधान बनला! सासरे नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया आली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 10:51 AM2022-10-25T10:51:54+5:302022-10-25T10:52:24+5:30

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत सुनक यांचे लग्न झाले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट झाली होती.

Son-in-law rishi Sunak became British Prime Minister! First reaction of father-in-law Narayan Murthy... | Rishi Sunak: जावई ब्रिटिशांचा पंतप्रधान बनला! सासरे नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया आली...

Rishi Sunak: जावई ब्रिटिशांचा पंतप्रधान बनला! सासरे नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया आली...

googlenewsNext

काळाने असे चक्र फिरविले की २०० वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा देश आता एक भारतीय व्यक्ती चालविणार आहे. भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांच्या नावाची घोषणा झाली असून ते ब्रिटनचे पंतप्रधान बनणार आहेत. दिवाळीदिवशीच ही मोठी घडामोड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यातच सुनक यांचे सासरे आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायणमूर्ती यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. 

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत सुनक यांचे लग्न झाले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट झाली होती. या दोघांना कृष्णा आणि अनुष्का अशी दोन मुले आहेत.

जावयावर बोलताना नारायण मूर्ती म्हणाले की, ''आम्हाला त्यांचा अभिमान आहे, ते यशस्वी होतील या शुभेच्छा देतो. युनायटेड किंगडममधील लोकांसाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करेल असा आम्हाला विश्वास आहे.'' पीटीआयला मूर्ती यांनी मेल करून ही प्रतिक्रिया दिली आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे असे नेते आहेत, ज्यांना सासर श्रीमंत असल्यामुळेही लक्ष्य केले जाते.

रतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. त्यांना कंझर्वेटिव्ह पार्टीच्या सुमारे १८० खासदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्याविरोधात लढणाऱ्या पेनी मोरडाँट यांना केवळ २६ खासदारांचा पाठिंबा मिळाला. पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने पेनी यांनी आपली दावेदारी मागे घेतली होती.
 

Web Title: Son-in-law rishi Sunak became British Prime Minister! First reaction of father-in-law Narayan Murthy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.