गाडीला ओव्हरटेक केले म्हणून आमदाराच्या मुलाने केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2016 02:09 PM2016-05-08T14:09:37+5:302016-05-08T15:26:08+5:30
गाडीला ओव्हरटेक केले म्हणून संतापलेल्या आमदाराच्या मुलाने एका वीस वर्षीय युवकाची गोळया झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
गया, दि. ८ - गाडीला ओव्हरटेक केले म्हणून संतापलेल्या आमदाराच्या मुलाने एका वीस वर्षीय युवकाची गोळया झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये घडली आहे. जदयू आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकीवर गोळया झाडण्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गयामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली.
मनोरमा देवी यांचे पती बिंदेश्वरी प्रसाद यादव उर्फ बिंदी यादव आणि त्यांचा अंगरक्षक राजेश कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. मगध रेंजचे डीआयजी सौरभ कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी कुमार यादव आणि त्याचे साथीदार एमयूव्ही गाडीमधून चालले होते.
त्याचवेळी त्या रस्त्यावरुन आदित्यकुमार सचदेव (२०) त्याच्या चार मित्रांसोबत एसयूव्ही गाडीमधून चालला होता. त्याचवेळी आदित्यची एसयूव्ही रॉकीला ओव्हरटेक करुन पुढे निघून गेली. त्यामुळे संतापलेल्या रॉकीने धडा शिकवण्यासाठी केलेल्या गोळीबारात आदित्य ठार झाला.
आदित्यला नारायण मेडीकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रॉकी फरार झाला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.
Jo kanooni prakriya hai hogi ab, kaanoon ka maan-samman karte hain: Bindi Yadav on son shoots dead youth in Bihar pic.twitter.com/iHfgvuJxHa
— ANI (@ANI_news) May 8, 2016