हृदयद्रावक! आईचा मृतदेह सोडून पळून गेला मुलगा; 2 दिवस पोलिसांनी घेतला शोध, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:25 AM2023-10-20T11:25:13+5:302023-10-20T11:25:51+5:30
65 वर्षीय महिलेला तिच्या मुलाने लोकबंधू रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र दोन दिवसांपूर्वी आजारी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लखनौमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलगा आपल्या सोडून पळून गेला. पोलिसांनी दोन दिवस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडलाच नाही. त्याचा फोनही बंद होता. अखेर पोलिसांनी मुलाचं कर्तव्य पार पाडत मृत महिलेवर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर लोक पोलिसांचं कौतुक करत आहेत. स्थानिकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी आशियाना येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेला तिच्या मुलाने लोकबंधू रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र दोन दिवसांपूर्वी आजारी महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी महिलेच्या मुलाला माहिती देताच तो बेपत्ता झाला. खूप शोधाशोध करूनही तो सापडला नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस महिलेच्या घरी पोहोचले असता त्यांना कुलूप दिसले.
महिलेच्या मुलाचा फोनही बंद येत होता. अशा स्थितीत काल कृष्णा नगर कोतवालीच्या इन्स्पेक्टरने आपल्या मुलाचं कर्तव्य पार पाडत महिलेवर अंत्यसंस्कार केले. त्यांनी स्वतःच्या हाताने मुखाग्नी दिला. यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस तिला रुग्णालयामधीन स्मशानभूमीत घेऊन गेले आहेत.
महिलेचा मुलगा मूळचा हरदोई जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. तो रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे. तो रस्त्याच्या कडेला गाडी उभी करतो. आईच्या मृत्यूची बातमी कळताच तो रुग्णालयातून पळून गेला. पोलीस त्याच्या घरी गेले असता त्यांना कुलूप दिसले. त्याचा फोनही बंद होता. आजूबाजूला कोणालाच त्याची माहिती नव्हती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.